Maharashtra Monsoon Alert 2026 मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; ११ ते १३ जून दरम्यान मुंबईत आगमनाचा अंदाज,

Maharashtra Monsoon Alert 2026 मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; ११ ते १३ जून दरम्यान मुंबईत आगमनाचा अंदाज,

मुसळधार पावसासह सलग ६ दिवस हायटाईडचा इशारा!

मुंबई:प्रतिनिधी

Maharashtra Monsoon Alert 2026 कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रवासियांसाठी आणि विशेषतः मुंबईकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, २०२६ चा मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. अरबी समुद्रातून मान्सूनची आगेकूच अत्यंत वेगाने सुरू असून, येत्या ११ ते १३ जून दरम्यान तो मुंबईत अधिकृतपणे दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) आता पुढे सरकले असून त्यांनी संपूर्ण कोकण भाग व्यापला आहे. ८ जून २०२६ रोजी मान्सूनने पश्चिम-मध्य आणि पूर्व-मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील २ दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. Maharashtra Monsoon Alert 2026

पुढील २४ ते ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार असून हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टीच्या भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा (Alert) जारी केला आहे.

मान्सूनपूर्व सरींनी हजेरी, उकाडा कायम

महाराष्ट्राच्या सीमेवर मान्सूनने प्रवेश केला असून मुंबई आणि उपनगरात मान्सूनपूर्व सरींसह मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या शहरात मान्सूनपूर्व वातावरणामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे; मात्र मान्सूनच्या अधिकृत आगमनानंतर तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळेल.

सावधान! १४ ते १९ जून दरम्यान समुद्राला मोठे उधाण

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका (BMC) आणि हवामान विभागाने मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. यंदाच्या पावसाळ्यात अरबी समुद्रात तब्बल २४ वेळा मोठी भरती (High Tide) येणार आहे.

त्यातच, मान्सून दाखल झाल्यानंतर लगेचच म्हणजे १४ ते १९ जून दरम्यान समुद्राला सलग सहा दिवस मोठे उधाण येणार आहे. या काळात समुद्रात ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जर याच काळात मुंबईत मुसधार पाऊस झाला, तर शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याची (Waterlogging) आणि पूरसदृश स्थिति निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाची तयारी पूर्ण

मुंबईत पाणी साचणारे हॉटस्पॉट्स, तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पालिकेने यंत्रणा सज्ज केली आहे. नागरिकांनी हवामानाच्या अधिकृत आणि रिअल-टाइम अपडेट्ससाठी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकृत पोर्टलला भेट द्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू