Shahrukh Khan Suspended :मुजोरी नडली, पत्रकारांना ‘दलाल’ म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे अखेर निलंबन

पत्रकार संघाटना आक्रमक पवित्रा, एसटी महामंडळाने घेतला मोठा निर्णय,
सातारा/महाबळेश्वर:
महाबळेश्वर आगारातील एका उद्दाम अधिकाऱ्याने कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांशी अत्यंत उर्मट, अयोग्य भाषेचा वापर करत थेट ‘दलाल’ संबोधल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुजोर वर्तनाचे तीव्र पडसाद संपूर्ण सातारा जिल्हाभर उमटले असून, सातारा आणि महाबळेश्वर पत्रकार संघाच्या आक्रमक पवित्र्यापुढे झुकत एसटी महामंडळाने संबंधित वाहतूक निरीक्षक शाहरुख खान Shahrukh Khan Suspended याला तडकाफडकी निलंबित (Suspend) केले आहे.
नेमका काय घडला होता प्रकार?
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने महाबळेश्वर येथे पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रवाशांची हीच गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर आगाराने नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर बस सोडण्याची व्यवस्था केली होती. मात्र, बसमध्ये प्रवासी पूर्ण भरल्यानंतरही गाडी बराच वेळ जागेवरून हलवण्यात आली नाही.
पुढील प्रवासासाठी अनेक प्रवाशांना एसटी आणि रेल्वे गाठायची घाई असल्याने, संतप्त प्रवासी आणि आगार कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. याच वेळी तिथे उपस्थित असलेला वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याने सुरुवातीला प्रवाशांशी नम्रपणे संवाद साधला, मात्र काही वेळातच त्याचा बोलण्याचा सूर बदलला आणि तो प्रवाशांवर डाण्यासारखा ओरडू लागला.
कॅमेरा ऑन होताच ‘shakrukh khan’चा पारा चढला!
प्रवाशांची होणारी घुसमट आणि अधिकाऱ्याची मुजोरी पाहून तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकारांनी या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण (Video Recording) सुरू केले. आपला काळा कारभार कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे पाहताच शाहरुख खान याचा पारा चांगलाच चढला. त्याने भान विसरून पत्रकारांशी अत्यंत उर्मट आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला, तसेच पत्रकारांना ‘दलाल’ म्हणत त्यांचा घोर अपमान केला.
पत्रकार संघ आक्रमक; आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासन हलले!
या घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्हा पत्रकार संघ आणि महाबळेश्वर पत्रकार संघाने एकत्र येत थेट आक्रमक पवित्रा घेतला, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार बांधवांनी तातडीने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र निषेध नोंदवला. सातारा विभागीय नियंत्रक (DC) ज्योती गायकवाड यांना थेट निवेदन देऊन, संबंधित अधिकाऱ्यावर २४ तासांच्या आत कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जिल्हाव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.
पत्रकारांचा हा आक्रमक पवित्रा आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी तात्काळ पत्रकारांची अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केली. तसेच या मुजोर अधिकाऱ्याच्या वर्तनाचा तीव्र निषेध करत, वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याला सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे जाहीर केले. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे पत्रकारांचा आणि सामान्य प्रवाशांचा विजय झाला आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांच्यासह अमित वाघमारे, उमेश भांबरे, ज्ञानेश्वर भोईटे, चंद्रकांत देवरुखकर, अमोल निकम, कैलास मायणे, प्रवीण शिंगटे, गजानन चेंणगे, निनाद बाजारे, विशाल कदम, बाळ लाटकर आदी ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.
हे पण वाचा PPF खात्यात दरवर्षी किती पैसे भरल्यास 15 वर्षांत 40 लाखांपर्यंत रक्कम मिळू शकते? संपूर्ण माहिती











