BIG NEWS: पिंपोडे खुर्द येथे विद्यार्थ्यांचा संताप, एसटी बस अडवली

BIG NEWS: पिंपोडे खुर्द येथे विद्यार्थ्यांचा संताप, एसटी बस अडवली

BIG NEWS एस.टी. बस थांबत नसल्याने परीक्षेला उशीर

BIG NEWS कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे आज सकाळी विद्यार्थ्यांनी एसटी बस अडवून संताप व्यक्त केला. साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन आणि देऊर या ठिकाणी थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. यामुळे विद्यार्थांनी थेट एस.टी. बस अडवून प्रशासनाला जागे केले.

गेल्या अनेक दिवसांपासून या तक्रारी होत असूनही एसटी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती. या आठवड्यात सातारला जाणाऱ्या विध्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत मात्र एस टी बसेस या थांबा असून देखील थांबत नसल्याने परीक्षेला उशीर होत आहेत, महाविद्यालयात वेळप्रसंगी बोल खावे लागत आहेत किंवा परीक्षेच्या पेपरला बसू दिले जात नाही यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अखेर आज सामाजिक कार्यकर्ते पिंपोडे खुर्द येथील निलेश कदम व इतर विद्यार्थ्यांनी मिळून एसटी बस अडवली आणि आपल्या समस्या ठळक केल्या. नीरा सातारा हा बस विद्यार्थ्यां अडवली काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

BIG NEWS
BIG NEWS

घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच हा प्रश्न एसटी प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, पुढील काळातही जर साताऱ्याकडे जाणाऱ्या बसेस पिंपोडे खुर्द, वाठार स्टेशन आणि देऊर येथे थांबल्या नाहीत, तर आणखी मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न गंभीर बनला असून, आता एसटी विभाग कोणती ठोस भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा https://maharashtraone.com/%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4/

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026)