Wathar Police Station solves gold theft case: पिंपोडे खुर्दमध्ये घरातून लांबवलेली २.८५ लाखांची सोन्याची मोहनमाळ पोलिसांकडून ५ दिवसांत हस्तगत; वाठार पोलिसांची ऐन दिवाळीत दमदार कामगिरी, आरोपींना ठोकल्या मुसक्या!

Wathar Police Station solves gold theft case: पिंपोडे खुर्दमध्ये घरातून लांबवलेली २.८५ लाखांची सोन्याची मोहनमाळ पोलिसांकडून ५ दिवसांत हस्तगत; वाठार पोलिसांची ऐन दिवाळीत दमदार कामगिरी, आरोपींना ठोकल्या मुसक्या!

सातारा / प्रतिनिधी

Wathar Police Station solves gold theft case कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे राहत्या घरातून सुमारे २ लाख ८५ हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ लांबवल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात मावस भाऊ आणि त्याच्या पत्नीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सुरेश बाळासाहेब यादव (वय ३२, रा. पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली अंदाजे २ तोळे वजनाची सोन्याची दोन पदरी मोहनमाळ चोरीला गेली होती. ही सोन्याची माळ मावस भाऊ प्रशांत हिम्मत जगताप व त्याची पत्नी सौ. साक्षी प्रशांत जगताप (दोन्ही रा. वडगाव, ता. फलटण, जि. सातारा) यांनी मुद्दाम लबाडीने चोरून नेल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार वाठार पोलिसांत CCTNS गु.र.नं. २५२/२०२६, BNS कलम ३०३(२) प्रमाणे २८ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे सलग ५ दिवस शोध; पुणे ग्रामीणमधून आरोपींना ठोकल्या मुसक्या

गुन्हा दाखल होताच वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलिसांना चकवा देत पुणे ग्रामीण परिसरात फिरणाऱ्या आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळवून पोलिसांनी सलग पाच दिवस शोधमोहीम राबवली. अखेर पोलिसांनी एका पुरुष आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीला गेलेली २ लाख ८५ हजार रुपये किमतीची २ तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ पूर्णपणे हस्तगत केली. ऐन दिवाळीच्या प्रारंभी चोरी गेलेले सोन्याचे दागिने सुरक्षित परत मिळाल्याने तक्रारदार यादव यांनी भावनिक समाधान व्यक्त करत वाठार पोलीस ठाण्याचे आभार मानले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पोलीस पथकाची धडक कारवाई

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि कोरेगाव विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पो.हवा. उदय जाधव, पो.हवा. धीरज यादव, पो.हवा. जितेंद्र शिंदे, पो.कॉ. विठ्ठल काळे, पो.कॉ. प्रतीक देशमुख आणि पो.कॉ. एकनाथ सरगर यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस हवालदार धीरज यादव करत आहेत.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू