Wathar Station Road Accident Case: वाठारमध्ये भीषण अपघात; ॲम्बुलन्सच्या विलंबामुळे २१ वर्षीय युवकाचा मृत्यू, संतप्त नागरिकांची तीव्र आंदोलनाची हाक!

वाठार स्टेशन/प्रतिनिधी
Wathar Station Road Accident Case वाठार प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हाकेच्या अंतरावर वाठार ते सातारा रस्त्यावर झालेल्या एका भीषण अपघातात २१ वर्षीय निष्पाप युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर तब्बल अर्धा तास ॲम्बुलन्स न मिळाल्यामुळे या युवकाचा तडफडून मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वाठार परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
भरधाव झायलोने मोटारसायकलला दिली जोराची धडक (The Accident Details)
Wathar Satara Road Accident: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ मे २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास वाठार ते सातारा जाणाऱ्या रोडवर ‘समर्थ फर्निचर’ समोर घडली. वाठार गावातील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे, गोपाळवस्ती येथे राहणारा सागर संपत चव्हाण (वय २१ वर्षे) हा त्याच्या हिरो ग्लॅमर मोटारसायकलवरून (क्र. MH 11 BR 8539) जात होता.
यावेळी वाठार ते लोणंद बाजूकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या भरधाव झायलो कारने (क्र. MH 04 GM 9495) सागरच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की सागर गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. याप्रकरणी झायलो चालक प्रदीप गोवर्धन पाटील (वय ३९, रा. मानोरा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲम्बुलन्सच्या विलंबामुळे गेला जीव; पिकअपमधून न्यावे लागले रुग्णालयात
Ambulance Delay Issue: वाठार प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हाकेच्या अंतरावर हा अपघात झाला, अपघातानंतर सागर गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावरच तडफडत होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असतानाही वेळेवर कोणतीही वैद्यकीय मदत पोहोचू शकली नाही. नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी अनेक ठिकाणी ॲम्बुलन्ससाठी फोन केले, मात्र एकही ॲम्बुलन्स वेळेत घटनास्थळी पोहोचली नाही.
अखेर नाईलाजास्तव नातेवाईकांनी स्वतःच्या पिकअप गाडीतून सागरला सातारा येथील रुग्णालयात नेले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. “जर वेळेवर ॲम्बुलन्स मिळाली असती, तर सागरचा जीव वाचला असता,” अशी आर्त भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
प्रशासनाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; केल्या ‘या’ मुख्य मागण्या
या दुर्दैवी घटनेनंतर वाठार स्टेशन येथील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत,लोणंद सातारा रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु असून यामार्गावर दररोज अपघात होत आहेत अशावेळी अपघातग्रस्थाना वाठार स्टेशन परिसरात चोवीस तास अत्याधुनिक ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात यावी व सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने तात्काळ दिशादर्शक फलक, सुरक्षा सूचना आणि गतिरोधक बसवावेत.
वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर असताना या केंद्राला रुग्णवाहिका नसल्याने वेळेत उपचार मिळत नाहीत “एका निष्पाप युवकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास Wathar Police Station चे अधिकारी करत आहेत.
Wathar Station Road Accident Case, Wathar Satara Road Accident, Satara Crime News, Ambulance Delay Issue, Sagar Sampat Chavan, Wathar News, Koregaon Satara News, Accident News Marathi, Maharashtra One News.











