पर्यटननगरी पाचगणीने रचला इतिहास! ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये देशात द्वितीय; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सन्मान Panchgani Swachh Survekshan Award 2026

पर्यटननगरी पाचगणीने रचला इतिहास! ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये देशात द्वितीय; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सन्मान Panchgani Swachh Survekshan Award 2026

देशातील २० हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या गटात पाचगणीला मानाचा पुरस्कार

Panchgani Swachh Survekshan Award 2026 केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ अभियानात २० हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात पाचगणी गिरीस्थान शहराने संपूर्ण भारतात द्वितीय क्रमांक पटकावून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेला या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवत पाचगणीने हे देदीप्यमान यश संपादन केले आहे.

नवी दिल्लीत दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार स्वीकारला

नवी दिल्ली येथील या दिमाखदार सोहळ्यात पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीप बगाडे, घाटजाई शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेखर कासुर्डे, नगरसेवक गणेश कासुर्डे आणि शहर समन्वयक ओंकार ढोले यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार स्वीकारला. पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणीत दरवर्षी लाखो पर्यटकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीतही शहराची स्वच्छता आणि सौंदर्य अबाधित राखण्यात पालिका प्रशासनाला मोठे यश आले आहे.

प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सफाई कर्मचाऱ्यांचे सांघिक यश

या मोहिमेच्या यशामध्ये मुख्याधिकारी पंडित पाटील, उपाध्यक्षा माधुरी कासुर्डे, आरोग्य सभापती राजश्री सणस आणि सर्व नगरसेवकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यासोबतच शहराचे आरोग्य रक्षक असलेले सर्व सफाई कर्मचारी, सफाई ठेकेदार, स्वच्छाग्रही आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घेतलेली अविरत मेहनत या यशाचा मुख्य कणा ठरली आहे.

पाचगणीच्या स्वच्छतेचे ‘सक्सेस मॉडेल’

पाचगणी शहरात ओला, सुका, प्लास्टिक, ई-कचरा आणि सॅनिटरी कचऱ्याचे घरोघरी जाऊन १०० टक्के वर्गीकरण व संकलन केले जाते. विशेष म्हणजे, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक स्वतः पुढाकार घेऊन घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करतात. प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन, स्वच्छता कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि नागरिकांचा सक्रिय लोकसहभाग यामुळे पाचगणीने राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संपूर्ण शहरातून आनंद व्यक्त केला जात असून, सर्व स्तरांतून पालिकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू