Fifa World Cup आणि Popstar Shakira चे ‘वाका वाका’ कनेक्शन; १८ वर्षांनंतरही ‘कोलंबियन ब्युटी’ची जादू जगभर कायम!

क्रीडा डेस्क/ महाराष्ट्र वन
फुटबॉलच्या मैदानात जेव्हा जेव्हा Fifa World Cup चा थरार सुरू होतो, तेव्हा केवळ खेळाडूंचे बूटच नाही तर जगभरातील फुटबॉल रसिकांचे पायही एका ठेक्यावर थिरकायला लागतात, आणि तो ठेका म्हणजे जागतिक कीर्तीची Popstar आणि कोलंबियन ब्युटी ‘शकिरा’ (Shakira). क्रीडा आणि संगीत विश्वात एक अत्यंत रंजक योगायोग पाहायला मिळतो, तो म्हणजे शकिरा ही २००६ आणि २००८ च्या काळापासून सलगपणे फिफा वर्ल्ड कपसाठी अँथेम सॉन्ग्स (Fifa World Cup Anthem Songs) म्हणजेच अधिकृत गाणी बनवत आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या फिफा विश्वचषक २०२६ मध्येही शकिराचे नवे गाणे जगभरातील हिटलिस्टवर राज्य करत आहे. मैदानातील चुरस एकीकडे आणि शकिराच्या गाण्यांची क्रेझ दुसरीकडे, असे एक भन्नाट वातावरण सध्या फुटबॉल जगतात पाहायला मिळत आहे. शकिराने आजवरच्या फिफा वर्ल्ड कपच्या प्रवासात एकापेक्षा एक सरस गाणी दिली असून, तिचा हा प्रवास प्रत्येक फुटबॉल रसिकाला थिरकायला लावणारा आहे.
शकिराच्या या फिफा प्रवासाची सुरुवात खऱ्या अर्थाने २००६ च्या जर्मनी फिफा वर्ल्ड कपपासून झाली, जिथे तिचे ‘हिप्स डोन्ट लाय’ (Hips Don’t Lie – Bamboo Version) हे गाणे क्लोजिंग सेरेमनीत प्रचंड गाजले. त्यानंतर २०१० मधील दक्षिण आफ्रिका फिफा वर्ल्ड कपमध्ये तिने दिलेले अधिकृत गाणे म्हणजेच ‘वाका वाका’ (Waka Waka – This Time for Africa) हे संगीत विश्वात मैलाचा दगड ठरले. हे गाणे रिलीज होऊन आता दीड देशापेक्षा जास्त काळ लोटला असला, तरी त्याची लोकप्रियता आजच्या घडीलाही यशाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. आजही कोणत्याही फुटबॉल स्टेडियममध्ये किंवा क्रीडा जगतातील मोठ्या मंचावर ‘वाका वाका’चे सूर वाजले, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते. या गाण्याने युट्यूबवर अब्जावधी व्ह्यूज मिळवून इतिहास रचला असून, फिफाच्या इतिहासातील हे आजवरचे सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अँथेम सॉन्ग मानले जाते. यानंतर २०१४ च्या ब्राझील फिफा वर्ल्ड कपमध्येही तिने ‘ला ला ला’ (La La La – Brazil 2014) हे धडाकेबाज गाणे आणले, ज्याने विश्वचषकाचा फिव्हर थेट चाहत्यांच्या डोक्यात चढवला होता.
यंदाच्या फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या निमित्ताने पुन्हा एकदा शकिराची तीच जादू चाहत्यांना अनुभवायला मिळत आहे. वय वर्ष ४९ असूनही शकिराने आपल्या आवाजाच्या आणि नृत्याच्या जोरावर नव्या गाण्याद्वारे फिफा काउबॉय आणि फुटबॉलचा टेम्पो प्रचंड वाढवला आहे. २००६ चे ‘हिप्स डोन्ट लाय‘, २०१० चे ‘वाका वाका’, २०१४ चे ‘ला ला ला’ ते आता दाई-दाई २०२६ मधील तिचे नवीन गाणे, शकिराचा हा आलेख नेहमीच उंचावत राहिला आहे. जगातील मोठे फुटबॉलपटू बदलले, अनेक देशांचे संघ बदलले, मात्र फिफा वर्ल्ड कपमधील शकिराचा आवाज आणि तिचा जलवा आजही तोच आहे. देश छोटा असो वा मोठा, खेळाडू नवा असो वा जुना, शकिराची गाणी फुटबॉलच्या या महाकुंभाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. म्हणूनच म्हणतात की, फुटबॉल हा जर जगाचा श्वास असेल, तर शकिराचा आवाज त्या श्वासाला संगीत देण्याचे काम करतो.
यंदा शकीराच्या ‘दाई दाई’ (Dai Dai) ने फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली
यंदाच्या फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या निमित्ताने पुन्हा एकदा शकिराची तीच जादू चाहत्यांना अनुभवायला मिळत आहे. यावेळी शकिराने आफ्रिकन संगीताचा बादशहा आणि प्रसिद्ध गायक बर्ना बॉय (Burna Boy) याच्यासोबत हातमिळवणी केली असून, त्यांचे ‘दाई दाई’ (Dai Dai) हे फिफा विश्वचषकाचे अधिकृत गीत सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. या गाण्याचे सर्वात मोठे आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्य म्हणजे, शकिरा आणि बर्ना बॉय यांनी या अधिकृत गाण्याचे चित्रीकरण अतिशय गरिबीत जगणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांसोबत केले आहे. फुटबॉल हा केवळ श्रीमंतांचा किंवा ग्लॅमरचा खेळ नसून तो थेट गरिबांच्या मनाशी जोडलेला खेळ आहे, हा संदेश तिने या व्हिडिओच्या माध्यमातून जगाला दिला आहे. एवढेच नव्हे तर एक संवेदनशील कलाकार म्हणून शकिराने या ‘दाई दाई’ गाण्यातून मिळणारा संपूर्ण महसूल (Revenue/Profit) त्याच झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि कल्याणासाठी दान करण्याचा एक अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे मैदानाबाहेरही शकिराने जगभरातील करोडो फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली असून, हे गाणे केवळ मनोरंजनाचे साधन न ठरता एका मोठ्या समाजकार्याचे माध्यम बनले आहे.












