दोन फुटबॉल स्टेडियममध्ये मावणारा देश! ४ वेळच्या वर्ल्ड कप विनर जर्मनीला नडला; ‘क्युरासाओ’चा ऐतिहासिक प्रवास आणि जिगर Fifa world cup 2026

दोन फुटबॉल स्टेडियममध्ये मावणारा देश! ४ वेळच्या वर्ल्ड कप विनर जर्मनीला नडला; ‘क्युरासाओ’चा ऐतिहासिक प्रवास आणि जिगर Fifa world cup 2026

क्रीडा डेस्क/महाराष्ट्र वन

“मैदानात उतरल्यावर देशाचा आकार नाही, तर छातीतील ‘जिगर’ मॅटर करतो!” याचा जिवंत प्रत्यय Fifa world cup 2026 च्या मंचावर पाहायला मिळाला आहे. फुटबॉल जगतात सध्या एका अशा देशाची चर्चा सुरू आहे, ज्याचे नाव आहे ‘क्युरासाओ’ (Curaçao) ज्याची लोकसंख्या केवळ दीड लाख आणि आकारमान गोव्यापेक्षाही आठपट लहान अशा सर्वात लहान देशाने ४ वेळच्या विश्वचषक विजेत्या बलाढ्य जर्मनीविरुद्ध क्युरासाओचा सामना झाला. या सामन्यात क्युरासाओचा ७-१ असा पराभव झाला असला, तरी या छोट्याशा देशाने जर्मनीला ज्या प्रकारे नडवलं, त्याची कहाणी सध्या जगभर व्हायरल होत आहे.

स्वप्नवत क्षण: जर्मनीला १-१ अशा बरोबरीत रोखलं!

Fifa world cup 2026 जर्मनी विरुद्ध क्युरासाओ सामन्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा क्युरासाओच्या पोरांनी जर्मनीला १-१ अशा बरोबरीत रोखून धरले होते! ४ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन संघाच्या तोंडचे पाणी पळवणारा हा क्षण क्युरासाओच्या नागरिकांसाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हता. फिफा सारख्या जागतिक स्पर्धेत पात्र होणे व पहिल्याच सामन्यात थेट जर्मनी सारख्या बलाढ्य संघासमोर उभं राहणं यासाठी जिगर लागते आणि Curaçao च्या फ़ुटबाँल खेळाडूंनी हे दाखवून दिले.

वैशिष्ट्य काय? …फक्त दोन फुटबॉल स्टेडियममध्ये मावणारा अख्खा देश!

या देशाचे आकारमान आपल्या गोवा राज्यापेक्षाही आठपट लहान आहे आणि लोकसंख्या फक्त १.५ लाख इतकी आहे. म्हणजेच जगातील दोन मोठी फुटबॉल स्टेडियम एकत्र केली, तर त्यात हा अख्खा देश मावू शकतो! फिफा विश्वचषकाच्या इतिहासात पात्र (Qualify) ठरलेला क्युरासाओ हा आकार आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत आजवरचा सर्वात लहान देश ठरला आहे. विशेष म्हणजे Curaçao हा देश म्हणजे कॅरेबियन समुद्रातील एक छोटेसे बेट आहे, जो २०१० मध्ये स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला.

७८ वर्षांचे वयोवृद्ध मॅनेजर ‘डिक अ‍ॅडव्होकाट’ आणि मायभूमीची हाक

क्युरासाओ संघाचे मुख्य मार्गदर्शक आणि मॅनेजर फुटबॉल जगतातील अत्यंत अनुभवी नाव डिक अ‍ॅडव्होकाट (Dick Advocaat) हे आहेत. त्यांचे वय सध्या ७८ वर्षे असून, विश्वचषकाच्या इतिहासात मुख्य मॅनेजर म्हणून नेतृत्व करणारे ते जगातील सर्वात वयोवृद्ध मॅनेजर ठरले आहेत. या संघातील जवळपास सर्वच खेळाडू हे युरोपमधील नेदरलँडचे रहिवासी आहेत आणि तिथल्या नामांकित डच लीगमध्ये खेळतात. मात्र, जेव्हा वर्ल्ड कप खेळण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी नेदरलँडऐवजी आपल्या छोट्याशा ‘मायभूमीची’ (क्युरासाओ) निवड केली. कॉन्काकॅफ (CONCACAF) पात्रता फेरीत सेंट व्हिन्सेंट आणि ग्वाटेमाला सारख्या संघांना धूळ चारत आणि प्ले-ऑफ सामन्यांमध्ये शिस्तबद्ध कामगिरी करत या संघाने थेट Fifa world cup 2026 विश्वचषकाचे तिकीट पक्के केले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू