Fifa World Cup 2026 Argentina Journey …म्हणून अर्जेंटिना आता आधीपेक्षा जास्त धोकादायक बनलाय!

योगेश जगदाळे -महाराष्ट्र वन न्यूज साठी –
Argentina Fifa World Cup 2026 Journey Messi आता अर्जेंटिना धोकादायक झाली आहे जास्त… ते सहज जिंकले असते तर गाफील राहिले असते… आता ते सावधानतेने खेळणार… आता ते जास्त गोल करायच्या प्रयत्ना ऐवजी गोल होणार नाही याची काळजी घेणार…. २ गोलच्या पिछाडीवरून जिंकल्यामुळे आपण गेलेली मॅच काढू शकतो हा confidence त्यांच्यात आला आहे…
यंदाच्या वर्ल्ड कपमधील अर्जेंटिनाचा प्रवास पाहिला तर तो प्रचंड चढ-उतारांचा आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा राहिला आहे. ग्रुप स्टेजमध्ये एका अनपेक्षित पराभवाचा धक्का बसल्यानंतर, बाद फेरीत (Knockout) संघाने ज्या पद्धतीने कमबॅक केले, ते त्यांच्या ‘फायटर’ वृत्तीची साक्ष देते. २ गोलने पिछाडीवर असतानाही सामन्याचा नूर पालटण्याची त्यांची किमया त्यांच्या मानसिक ताकदीची प्रचिती करून देते.
इतिहासाची पाने उलटली तर अर्जेंटिनाने आजवर ३ वेळा (१९७८, १९८६ आणि २०२२) विश्वविजेतेपदाच्या करंडकाला गवसणी घातली आहे. हा संघ आज जगातील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक का मानला जातो? कारण त्यांच्याकडे केवळ मैदानावर धावणारे खेळाडू नाहीत, तर कठीण प्रसंगात गेम फिरवण्याची क्षमता असलेले मॅचविनर्स आहेत. लिओनेल मेस्सीसारखा जगातील सर्वोत्तम ‘इन्स्पिरेशनल’ लीडर त्यांच्याकडे आहे, ज्याच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण टीम आपला जीव पणाला लावते. तरुणांचा जोश आणि अनुभवी खेळाडूंचा ताळमेळ, आक्रमक फॉरवर्ड लाईन आणि मध्यफळीतील चपळता यामुळे हा संघ बलाढ्य आणि अभेद्य बनला आहे. इतिहासाची हीच पुनरावृत्ती यंदाही होताना दिसत असून, मागच्या चुकांमधून धडा शिकलेला हा संघ आता जेतेपदाचा प्रमुख दावेदार बनला आहे.
दुसरीकडे अर्जेंटिना स्विस आर्मी ला हरवेल… एखादा चमत्कारच स्वित्झर्लंड ला जिंकून शकतो… पण त्यांच्याकडे मेस्सी सारखा inspirational कोणी नाही. आतापर्यंत गोल धडाका खेळ झाला… आता डिफेन्स गेम सुरू… ज्याचा डिफेन्स चिवट तो तगून राहणार… मोरोक्को जबरदस्त fight देणार, काहीही होऊ शकते.
स्पेन ने अजूनपर्यंत निराश केले आहे.. तर मोरोक्कोने अप्रतिम खेळ केला आहे… मानसिकदृष्ट्या प्रचंड कणखर आहे ती टीम… पण फ्रान्स १९९८ नंतर एक football powerhouse झालेली आहे. Tactical superiority फ्रान्सबरोबर आहे…
स्पेन चा पोर्तुगाल बरोबरचा खेळ पाहिल्यावर बेल्जियम त्यांच्या दांड्या उडवू शकते असे वाटत आहे… स्पेन ला यमाल खेळला तरच नीट आशा आहेत… नाहीतर नुसते पास पास खेळून जिंकणे अवघड आहे.. बेल्जियम कडे playmaker आणि स्ट्रायकर असा चांगले कॉम्बिनेशन आहे…
इंग्लंड चा खेळ खुलला आहे ते धोकादायक बनले आहेत.. इंग्लंड vs नॉर्वे या मॅचमध्ये हरायचे का जिंकायचे हे इंग्लंड ठरवणार… हॅरी केन ची अचूकता नॉर्वेला अडचणीत आणू शकते. Haaland ला बाकीच्यांची साथ मिळाली पाहिजे.. तो नंबर ९ म्हणून खेळतोय.. इंग्लंडने ब्राझील vs नॉर्वे match नीट पाहिली तर आणि ब्राझील च्या चुका केल्या नाहीत तर इंग्लंड जिंकायला हरकत नाही..
शेवटी मॅचेस कमालीच्या दर्जेदार आणि चुरशीच्या व्हाव्यात हीच इच्छा… आतापर्यंत मनोरंजनाची रणधुमाळी उधळलेल्या या वर्ल्ड कप मध्ये शेवटच्या टप्प्यात रोमांचाचा कळस गाठला जाईल यात शंकाच नाही











