FIFA World Cup 2026: बलाढ्य स्पेनला रोखले आणि मैदानावरच अश्रूंचा बांध फुटला! ४० वर्षांच्या ‘त्या’ गोलकीपरची जग हलवून सोडणारी भावूक कहाणी

क्रीडा डेस्क/महाराष्ट्र वन
फुटबॉलच्या मैदानावर अनेकदा असे चमत्कार घडतात, जे इतिहास बनतात. पण, काही चमत्कार असे असतात जे केवळ इतिहासच घडवत नाहीत, तर जगातील कोट्यवधी लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात. FIFA World Cup 2026 मध्ये असाच एक अंगावर काटा आणणारा क्षण पाहायला मिळाला. एका बाजूला फुटबॉल जगतातील महासत्ता असलेला ‘स्पेन’ (Spain) देश, तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही लाख लोकसंख्या असलेला छोटासा बेट राष्ट्र ‘केप व्हर्डे’ (Cape Verde)!
या ऐतिहासिक Spain vs Cape Verde World Cup 0-0 Match मध्ये केप व्हर्डेने स्पेनला ०-० अशा बरोबरीत रोखून फुटबॉल विश्वाला सर्वात मोठा धक्का दिला. पण, या विजयाचा महानायक ठरलेल्या ४० वर्षांच्या गोलकीपर Cape Verde Goalkeeper Vozinhaच्या एका कृतीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले.
स्पेनचे २७ हल्ले परतवून लावणारा ‘द वॉल’ वोझिन्या!
सामन्यात स्पेनच्या खेळाडूंनी केप व्हर्डेच्या गोलपोस्टवर एकामागून एक तब्बल २७ जोरदार हल्ले चढवले. स्पेनचा विजय निश्चित मानला जात होता, पण त्यांच्या आणि गोलपोस्टच्या मध्ये भिंत बनून उभा होता केप व्हर्डेचा Cape Verde Goalkeeper Vozinha!
वयाच्या ४० व्या वर्षी विश्वचषकात पदार्पण करणारा वोझिन्या हा या स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या अनुभवाचे आणि कौशल्याचे असे प्रदर्शन केले की, स्पेनचे स्टार स्ट्रायकर देखील चक्रावून गेले. Vozinha vs Spain या सामन्यात Vozinha 7 Saves Against Spain अशी अद्भूत कामगिरी करत स्पेनला एकही गोल करू दिला नाही. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी त्याला Player of the Match पुरस्काराने गौरवण्यात आले.
…आणि सामन्याचा सायरन वाजताच ४० वर्षांचा वाघ लहान मुलासारखा रडला!
सामना संपल्याची शिट्टी वाजताच केप व्हर्डेच्या खेळाडूंनी जल्लोष सुरू केला. पण, ज्या वोझिन्याने मैदानात स्पेनच्या वादळाला रोखले होते, तो अचानक गुडघ्यावर बसला. त्यानंतर Vozinha Cried For Mother हा मैदानातील सर्वात भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. तो मैदानातच आईच्या आठवणीने ढसाढसा रडू लागला. याचबरोबर त्याच्या आजीच्या आठवणींनी त्याच्या अश्रूंचा बांध मोकळा झाला.
हा आनंदाचा अश्रू नव्हता, तर त्यामागे एका मुलाचे आपल्या आईसाठी तडफडणारे हृदय होते. ४० वर्षांच्या संघर्षानंतर आपला मुलगा जेव्हा जगातील सर्वात मोठ्या मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करत होता, तो क्षण पाहण्यासाठी त्याची आई स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकली नाही. सामन्यानंतर वोझिन्या म्हणाला, “माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा दिवस होता, पण ज्या माऊलीने मला इथे पोहोचवले, तीच हा खेळ पाहायला समोर नव्हती… तिची आठवण आल्यामुळे मी माझे अश्रू रोखू शकलो नाही.”
वोझिन्याच्या अश्रूंनी प्रशासनाला झुकवले; आईला मिळाला व्हिसा!
वोझिन्याच्या या अश्रूंचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. वोझिन्याची ही व्यथा जेव्हा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली, तेव्हा अवघ्या काही तासांत चक्रे फिरली.
आता क्रीडा रसिकांसाठी सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण Vozinha Mother Ana Candida Evora US Visa Approved झाली असून त्यांना तातडीने विशेष मंजुरी देत अमेरिकेचा व्हिसा जारी करण्यात आला आहे! त्यामुळे केप व्हर्डेच्या पुढील सामन्यात वोझिन्याची आई स्वतः स्टेडियममध्ये उपस्थित राहून Fifa wolrld cup 2026 मधील पुढील सामन्यात आपल्या लढवय्या मुलाचा खेळ पाहणार आहे. तुम्ही या क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स Maharashtra One News वर पाहू शकता.











