Tukaram Mundhe News खासगी रुग्णालयांना मोठा दणका! ‘आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्या’ म्हणाल तर थेट लायसन्स रद्द, FDA चा कडक आदेश!

Tukaram Mundhe News खासगी रुग्णालयांना मोठा दणका! ‘आमच्याच मेडिकलमधून औषधं घ्या’ म्हणाल तर थेट लायसन्स रद्द, FDA चा कडक आदेश!

मुंबई/प्रतिनिधी

आपल्या कडक आणि धडक कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे Tukaram Mundhe यांनी आता राज्यातील खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला आणि एकाधिकारशाहीला मोठा लगाम लावला आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना औषधे केवळ त्याच रुग्णालयातील फार्मसीमधून (In-house Pharmacy) खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना FDA कडून अंतिम आणि कडक इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करणे कायद्याने बंधनकारक नाही. औषधे कुठून घ्यायची, हा पूर्णपणे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचा वैयक्तिक अधिकार आहे. कोणतीही संस्था किंवा रुग्णालय नागरिकांवर अशी सक्ती करू शकत नाही.”

‘हा’ केवळ सल्ला नाही, तर अधिकृत शासकीय आदेश!

अनेक मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये स्वतःच्या फार्मसी चालवल्या जातात. बऱ्याचदा तीच औषधे बाहेरील मेडिकल स्टोअर्समध्ये किंवा जेनेरिक स्वरूपात अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असतात. तरीही रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्यास मज्जाव केला जातो आणि अंतर्गत फार्मसीतूनच महागडी औषधे घेण्यास भाग पाडले जाते, अशा अनेक तक्रारी FDA कडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी हा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक आदेश जारी केला आहे.

नवीन नियमानुसार रुग्णालयांवर खालील गोष्टी बंधनकारक राहतील:

  • प्रिस्क्रिप्शन हातात देणे बंधनकारक: डॉक्टरांना रुग्णासाठी आवश्यक असलेल्या सर्व औषधांचे प्रिस्क्रिप्शन (चिठ्ठी) नातेवाइकांच्या हातात देणे आता बंधनकारक राहील.
  • रुग्णांना खरेदीचे पूर्ण स्वातंत्र्य: रुग्ण त्यांच्या सोयीनुसार आणि परवडणाऱ्या किमतीनुसार कोणत्याही नोंदणीकृत मेडिकलमधून औषधे खरेदी करू शकतील.
  • जेनेरिक औषधांचा पर्याय: रुग्णांना हवे असल्यास ते बाजारात उपलब्ध असलेल्या स्वस्त आणि दर्जेदार जेनेरिक औषधांचाही पर्याय निवडू शकतात.

थेट FDA कडे तक्रार करा; रुग्णालयांवर होणार मोठी कारवाई

Tukaram Mundhe यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, हा केवळ एक साधा सल्ला नसून अधिकृत शासकीय आदेश आहे. जर एखाद्या रुग्णालयाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रुग्णांवर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर स्वतःच्या फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्यासाठी दबाव टाकला, तर नागरिकांना थेट FDA कडे तक्रार करता येणार आहे. अशा तक्रारींची अत्यंत गंभीर दखल घेऊन संबंधित रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यासह त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.

FDA च्या या धडक निर्णयामुळे खासगी रुग्णालयांच्या कथित लूटमारीला चाप बसणार असून, सर्वसामान्यांच्या औषध खर्चात खूप मोठी बचत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tukaram Mundhe FDA Orders Hospital Pharmacy, FDA Commissioner Tukaram Mundhe Action on Private Hospitals, Hospital Medicine Compulsory Rules Maharashtra, Private Hospital Pharmacy Monopoly FDA Action, Generic Medicine Option Patient Rights India.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू