GOA NEWS गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निलेश सांबरे यांचा सन्मान

GOA NEWS जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या कार्याचा गौरव
प्रकाश राजे/ महाराष्ट्र वन ,पणजी : GOA NEWS डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पणजी येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांना उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘विशेष महागौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गोव्याचे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
.पणजी येथील कला अकादमीत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित तिसऱ्या ‘राष्ट्रीय महाअधिवेशनाचे’ उद्घाटन डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले, यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘विशेष महागौरव पुरस्कार २०२६’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, आयुष्मान भारत योजनेचे डॉ. ओमप्रकाश शेटे, खासदार सदानंद तानावडे, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, रामकृष्ण वेताळ, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण देशभरातील हजारो पत्रकार उपस्थित होते.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या १७ वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती व रोजगार अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राच्या उभारणीसाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. हा पुरस्काररूपी सन्मान केवळ वैयक्तिक गौरव नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या नि:स्वार्थ सेवेला मिळालेली मान्यता आहे, असे मत निलेश सांबरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तर, या सन्मानामुळे जिजाऊ संस्थेच्या कार्याला अधिक बळ मिळून आगामी काळात अधिक व्यापक राष्ट्रीय स्तरावर जनसेवा करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे, असे मत उपस्थित मान्यवरानी व्यक्त केले.












