CM West Bengal सुवेंदू अधिकारी घेणार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; भाजपचा पहिला मुख्यमंत्री म्हणून रचणार इतिहास!

कोलकाता: भारतीय राजकारणातील एक मोठे वादळ आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे वजनदार नेते सुवेंदू अधिकारी उद्या, ९ मे २०२६ रोजी पश्चिम बंगालचे CM West Bengal ९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणारे ते भारतीय जनता पक्षाचे पहिलेच नेते ठरतील. कोलकाता येथील ऐतिहासिक ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर हा सोहळा पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 207 जागा जिंकत भाजपने ममता बॅनर्जी यांचा पाडाव करीत ऐतिहासिक विजय मिळवत सत्तांतर केले. यामुळे भाजप कोणाला मुख्यमंत्री बनवणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते अखेर सुवेंदू अधिकारी यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली.
कोण आहेत सुवेंदू अधिकारी?
सुवेंदू अधिकारी यांचा जन्म १५ डिसेंबर १९७० रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एका राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे माजी केंद्रीय राज्यमंत्री आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९५ मध्ये काँग्रेसमधून केली, त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे भूषवली.
नंदीग्राम आंदोलनाचे शिल्पकार
२००७ मध्ये नंदीग्राममधील जमीन संपादन विरोधी आंदोलनाचे नेतृत्व सुवेंदू अधिकारी यांनी केले होते. या आंदोलनामुळेच ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, २०२० मध्ये अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.
२०२६ च्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजय
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी अभूतपूर्व कामगिरी केली. त्यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, भवानीपूरमध्ये त्यांनी मावळत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव करत १९६७ सालच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली.
राजकीय प्रवास एका नजरेत:
- १९९५: काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवड.
- २००६: पहिल्यांदा विधानसभा आमदार (कांथी दक्षिण).
- २००९ व २०१४: तामलुक मतदारसंघातून खासदार (Lok Sabha).
- २०१६-२०२०: पश्चिम बंगाल सरकारमध्ये परिवहन आणि जलसंपदा मंत्री.
- २०२०: भारतीय जनता पक्षात प्रवेश.
- २०२१: नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला आणि विरोधी पक्षनेते झाले.
- ८ मे २०२६: भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड.
उद्याचा शपथविधी
अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. उद्या सकाळी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. CM West Bengal सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आता पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन होत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या नव्या पर्वाकडे लागले आहे.












