जयहिंद अकॅडमीच्या सचिन जाधव यांना ‘सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’

जयहिंद अकॅडमीच्या सचिन जाधव यांना ‘सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’

तारळे गावाचे सुपुत्र आणि शेंद्रे (ता. सातारा) येथील जयहिंद अकॅडमीचे संस्थापक सचिन जाधव यांना युवक कल्याणसाठी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल ‘सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.

सातारा/प्रतिनिधी

सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट चा 18 वा वर्धापन दिन व भारतविख्यात कालकथित कलाश्री विलासराव वाईकर यांच्या स्मृति दिनानिमित्त सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय युवा उद्योगरत्न पुरस्कार 2025 हा सचिन जाधव यांना देण्यात आला. सचिन जाधव हे जयहिंद अकॅडमीच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शेकडो युवक सैन्य व पोलीसदलात भरती झाले आहेत व देशसेवा करीत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. जयसिंगपूरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळोखे, सामाजिक कार्यकर्त्यां 

मनिषा पुणेकर, सह्याद्री फिल्म्स अँड मॅनेजमेंट संस्थेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. मीनाक्षी गणेश वाईकर, संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश विलासराव वाईकर, 

सुप्रसिद्ध वक्ते प्रा. तोहीद मुजावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सचिन भरत जाधव यांचा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या निवडीबद्दल जयहिंद करिअर अकॅडमीच्या संस्थापिका दिपाली सचिन जाधव, संस्थेचे विद्यार्थी पालक व शेंद्रे, तारळे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

दिपाली जाधव यांनाही महिला गौरव पुरस्कार

जयहिंद करिअर अकॅडमीच्या संस्थापिका दिपाली सचिन जाधव यांनाही अखिल भारतीय मुकनायक चित्रपट संघटनेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

jayhind acadamy

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू