Police Bharati 2026 :जिजाऊ मोफत पोलीस अकॅडेमीचा डंका, कल्याण मधील मुलांचे पोलीस भरतीत यश

Police Bharati 2026 संस्थापक निलेश सांबरेंनी साधला ग्रामस्थांशी संवाद
कल्याण/प्रतिनिधी
जिजाऊ मोफत UPSC/MPSC वाचनालय व जिजाऊ मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, वासिंद येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी आज यशाची नवी परंपरा निर्माण करत असून, ऋतिका भगवान जाधव हिची मीरा-भाईंदर पोलीस दलात तर दयेश विलास चौधरी याची मुंबई पोलीस, मुंबई कारागृह पोलीस तसेच मीरा-भाईंदर पोलीस दलात चालक पोलीस म्हणून अभिमानास्पद निवड झाली आहे. Police Bharati 2026 या दुहेरी यशामुळे संपूर्ण कल्याण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
या अभिमानास्पद यशानिमित्त फळेगाव आणि पळसोली (कल्याण) येथील ग्रामस्थ व मित्रपरिवाराच्या वतीने भव्य सत्कार सोहळा आणि विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय निलेशजी सांबरे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने निलेशजी सांबरे साहेबांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान ऋतिका जाधव आणि दयेश चौधरी यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच आयोजित करण्यात आलेल्या विजय रॅलीतही मोठ्या उत्साहात सहभाग घेण्यात आला. संपूर्ण परिसर घोषणांनी, जल्लोषाने आणि अभिमानाच्या वातावरणाने दुमदुमून गेला होता.
ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील युवक-युवतींना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देण्याचे कार्य निलेशजी सांबरे साहेब जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सातत्याने करत आहेत. मोफत मार्गदर्शन, अभ्यासाची सुविधा, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या बळावर आज अनेक विद्यार्थी सरकारी सेवेत दाखल होत असून, जिजाऊ संस्था हजारो कुटुंबांसाठी आशेचा आधारवड बनली आहे.
उपस्थित ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “पूर्वी सरकारी नोकरी हे फक्त स्वप्न वाटायचे, पण निलेशजी सांबरे साहेबांनी ग्रामीण भागातील मुलांच्या मनात मोठी स्वप्ने निर्माण केली. आज आमच्या गावातील मुलं-मुली पोलीस व सेनादलाच्या सेवेत भरती होत असून यातून देशसेवा सोबत एक पूर्ण कुटूंब सक्षम होत आहे.












