कोरेगावच्या श्री अकॅडमीचे राज्यस्तरीय मंथन स्पर्धेत दमदार यश

कोरेगावच्या श्री अकॅडमीचे राज्यस्तरीय मंथन स्पर्धेत दमदार यश

मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा गुणगौरव

शेखर रसाळ/ महाराष्ट्र वन न्यूज, कोरेगाव

आसरे, ता. कोरेगाव येथील श्री अशोक नामदेव सणस शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री अकॅडमी, कोरेगाव येथील विद्यार्थ्यांनी मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेस बसविण्यात आले होते. परीक्षेचा निकाल ३० मार्च २०२६ रोजी जाहीर झाला.
या स्पर्धेतील गुणवत्ता यादीत ल्हासुर्णे येथील विद्यार्थी अर्णव विशाल शेलार याने १५० पैकी १३८ गुण मिळवत राज्यात सातवा तर सातारा जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला. अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच वर्षात मिळालेल्या या यशामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तसेच कु. यज्ञेश नरेंद्र कोरे व कु. देवांश औदुंबर पवार या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १५० पैकी ११४ गुण मिळवून शाळेच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
परीक्षेतील या उज्ज्वल यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभात नगरसेवक सागर वीरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व स्टडी टेबल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी सैनिक कल्याणराव मारुती शेलार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अकॅडमीस सातत्याने सहकार्य करणारे पत्रकार शेखर रसाळ यांचा सत्कार नरेंद्र कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या यशाबद्दल पालकांनी आपल्या मनोगतातून श्री अकॅडमीचे संस्थापक बाळासो अशोक सणस, मुख्याध्यापिका सौ. नूतन बाळासो सणस तसेच सर्व शिक्षकवर्ग यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका सौ. नूतन बाळासो सणस यांनी केले.
या उल्लेखनीय यशामुळे श्री अकॅडमीने शैक्षणिक क्षेत्रात भक्कम पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे पण वाचा Yatra 2026 देऊरला यात्रेनिमित्त चेअरमन चषक कब्बडी स्पर्धा, बाणेर पुणे ठरले विजेते, वाघेश्वर चरोली उपविजेता!

हे पण वाचा Akshaya Tritiya 2026: सोने खरेदीचा अक्षय मुहूर्त, जाणून घ्या महत्व सोनेखरेदीचे महत्व

lagnaustav.com
lagnaustav.com

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026)