ZP school : देऊर शाळेसाठी धनश्री इंडस्ट्रीज कामगार संघटनेचा मदतीचा हात!

सातारा | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था
सामाजिक जाणिवेतून आणि प्रत्यक्ष कृतीशीलतेतून सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळा, देऊर ZP school येथील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एका सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. शाळेतील पोषण आहार शिजवणाऱ्या सेविकांची गेल्या २ वर्षांपासून असलेली मोठ्या कुकरची मागणी अखेर पूर्ण झाली असून, यामुळे शालेय पोषण आहार वेळेवर आणि उत्तम प्रकारे बनवण्यास मोठी मदत होणार आहे.
कै. विजयाभाभी जी. मुथा यांच्या पवित्र स्मरणार्थ, धनश्री इंडस्ट्रीज कामगार संघटना (मुथा फाऊंड्रीज, डी-१२, जुनी M.I.D.C. सातारा) यांच्या वतीने देऊर शाळेला २२ लिटरचा भव्य प्रेशर कुकर सप्रेम भेट देण्यात आला. या मदतीमुळे दररोज शालेय पोषण आहार बनवणाऱ्या पोषण आहार सेविकांचे कष्ट कमी होणार असून, विद्यार्थ्यांनाही वेळेवर गरम व पौष्टिक आहार मिळणे सुलभ होणार आहे.
कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापनाचे मानले आभार
शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि पोषण आहार सेविकांच्या प्रत्यक्ष अडचणीची गांभीर्याने दखल घेऊन ही मोलाची मदत केल्याबद्दल Dhanashree Industries Worker Union चे अध्यक्ष श्री. दिनेश पाटेकर, उपाध्यक्ष श्री. मंगेश मिसे, सचिव श्री. सोमनाथ जाधव, खजिनदार श्री. किशोर कदम, सल्लागार श्री. सुनिल माने तसेच Mutha Foundries च्या संपूर्ण व्यवस्थापनाचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच कारगिल विजय दिवस दिनानिमित्त माजी नौदल सैनिक यशदीप कदम यांचा सन्मान करण्यात आला.

पालकांचाही मदतीचा हात पुढे
देऊर जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्ता पूर्ण कामगिरीमुळे शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, तसेच शाळेच्या विकासातही माजी विद्यार्थी व पालक माजी शाळा हि भावना स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षक व विदयार्थी यांचा उत्साह दुणावला आहे. माजी विदयार्थी व पालक अरुण पालकर यांनी गॅस शेगडी भेट दिली, तर सचिन कदम यांनी तबला व हार्मोनियम भेट दिली तसेच माजी विद्यर्थिनी स्नेहा वेळेवर यांनी बुद्धिबळ पट संच भेट देत शाळेविषयी ऋणानुबंध व्यक्त केले.
ग्रामस्थ आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या मदत सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपसरपंच राजेंद्र कदम, माजी ग्रामपंचायत सदस्य अजित कदम, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश कदम, माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष सूरज कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विजय टंकसाळे, उत्तर कोरेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश राजे, सचिन कदम, नंदकुमार कदम, राहुल कदम, सोमनाथ महामुनी, अनुजा पालकर, वनिता कदम यांच्यासह शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक वैशाली चव्हाण सर्वांचे यांनी स्वागत केले तर रमेश चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.











