Lost Mobile Recovered :वाठार पोलिसांचा धडाका! ६ लाखांचे २५ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना केले परत!

Lost Mobile Recovered :वाठार पोलिसांचा धडाका! ६ लाखांचे २५ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना केले परत!

सातारा / प्रतिनिधी

वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल ६,१५,०००/- रुपये किमतीचे एकूण २५ मोबाईल फोन हस्तगत Lost Mobile Recovered करण्यात वाठार पोलिसांना मोठे यश आले आहे. सातारा सायबर पोलिसांच्या मदतीने अत्यंत चिकाटीने तांत्रिक तपास करत पोलिसांनी ही धडक मोहीम यशस्वी केली असून, सर्व हस्तगत केलेले मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत देण्याची अत्यंत कौतुकास्पद कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, आणि सातारा ग्रामीण विभागाच्या (कॅम्प कोरेगाव) उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले यांनी हद्दीतील गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या.

वाठार पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ आणि सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी अत्यंत कौशल्याने आणि तांत्रिक बाबींच्या आधारे गहाळ मोबाईलचा शोध सुरू केला. संबधित मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करून थेट महाराष्ट्र आणि इतर राज्यांतून हस्ते परहस्ते मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क साधण्यात आला. पोलिसांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि चिकाटीमुळे अखेर २५ महागडे मोबाईल फोन Lost Mobile Recovered जप्त करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल फोन पुन्हा सुस्थितीत हातात मिळाल्याने संबंधित नागरिकांनी वाठार पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या हितासाठी आणि गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी अशी मोबाईल शोध मोहीम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

वाठार पोलिसांची ही अभिमानास्पद कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाचे पोलीस उपनिरीक्षक (पोउनि.) गहिणीनाथ सातव, पोउनि. नितीन भोसले, पोलीस हवालदार (पो.हवा.) तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, तसेच पोलीस कॉन्स्टेबल (पो.कॉ.) विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतिक देशमुख, आशा देशमुख आणि सातारा सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण टीमने मिळून केली आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू