Petrol-Diesel Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! २ आठवड्यांत चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले
Petrol च्या दरात प्रतिलिटर २.६१ रुपये, तर Diesel च्या दरात प्रतिलिटर २.७१ रुपयांची वाढ
नवी दिल्ली: प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा Petrol-Diesel Price पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. Petrol च्या दरात प्रतिलिटर २.६१ रुपये, तर Diesel च्या दरात प्रतिलिटर २.७१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या अवघ्या दोन आठवड्यांतील ही चौथी दरवाढ असून, यामुळे पेट्रोल-डिझेल एकूण ७.५ रुपयांनी महागले आहे.
१० दिवसात चौथ्यांदा दरवाढ
Petrol-Diesel Price सातत्याने वाढत असून गेल्या १० दिवसात हि चौथ्यांदा केलेली वाढ आहे यापूर्वी १५ मे रोजी Petrol-Diesel Price मध्ये पहिली दरवाढ झाली होती. त्यानंतर १९ मे रोजी त्यानंतर २३ मे इंधन दरवाढ झाली होती, आज २५ मे रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा दरवाढीची घोषणा केली यामुळे गेल्या १० दिवसात झालेली चौथी दरवाढ हि महागाईला चटका देणारी ठरला.
Fuel Price Hike चे मुख्य कारण काय?
अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या वादामुळे जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या (Crude Oil) किमतीत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘Strait of Hormuz’ (होरमुझची सामुद्रधुनी) बंद झाल्याने पुरवठा विस्कळीत झाला आहे.
ओएनजीसी (ONGC) संचालक सुषमा रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल महाग होत असतानाही सरकारने सलग ७६ दिवस देशांतर्गत किमती स्थिर ठेवून ग्राहकांना दिलासा दिला होता. मात्र, यामुळे तेल कंपन्यांना (OMCs) दररोज तब्बल १,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. हा तोटा भरून काढण्यासाठी अखेर ही दरवाढ करणे भाग पडले आहे.
City-Wise Petrol and Diesel Rates (प्रमुख शहरांतील आजचे दर)
या ताज्या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर खालीलप्रमाणे आहेत:
| शहर (City) | पेट्रोलचा नवीन दर (Petrol Rate) | डिझेलचा नवीन दर (Diesel Rate) |
| मुंबई (Mumbai) | Rs 111.21 (+२.७२) | Rs 97.83 (+२.८१) |
| दिल्ली (Delhi) | Rs 102.12 (+२.६१) | Rs 95.20 (+२.७१) |
| कोलकाता (Kolkata) | Rs 113.51 (+२.८७) | Rs 99.82 (+२.८०) |
| चेन्नई (Chennai) | Rs 107.77 (+२.४६) | Rs 99.55 (+२.५७) |
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; महागाई वाढण्याची शक्यता
गेल्या अनेक महिन्यांच्या स्थिरतेनंतर १६ मे रोजी पहिल्यांदा इंधनाचे दर ३ रुपयांनी वाढले होते. एप्रिल २०२२ नंतर देशात इंधन दर जवळपास स्थिर होते (केवळ मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी २ रुपयांची कपात झाली होती).
मात्र, आता सलग होत असलेल्या या दरवाढीमुळे वाहतूक आणि लॉजिस्टिकचा (Transportation & Logistics) खर्च मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. परिणामी, येत्या काही दिवसांत अत्यावश्यक वस्तू, भाजीपाला आणि अन्नधान्य अधिक महाग होण्याची शक्यता आर्थिक विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिक, नोकरदार वर्ग आणि व्यापारी क्षेत्राला बसणार आहे.
Petrol Diesel Price Hike India, Fuel Price Revision, Mumbai Petrol Price, Fuel Price Today, Petrol Diesel Rates, Maharashtra News, Maharashtra One News.












