Deool Band 2′ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ३ दिवसांतच कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, देशभरात २००० हून अधिक शोज!

Deool Band 2′ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; ३ दिवसांतच कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, देशभरात २००० हून अधिक शोज!

मुंबई-प्रतिनिधी

लेखक-दिग्दर्शक Pravin Tarde यांच्या ‘Deool Band 2’ या चित्रपटाने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा इतिहास रचला आहे. गुरुवारी ५० हून अधिक शहरांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ देशभरात पाहायला मिळत असून, संपूर्ण भारतात २००० पेक्षा जास्त शोज (2,000+ Shows) द्वारे या चित्रपटाला स्क्रीन स्पेस मिळाली आहे. पहिल्याच दिवशी जवळपास २.९८ कोटींची बंपर ओपनिंग घेतल्यानंतर, वीकेंडच्या शनिवारी आणि रविवारी या कमाईत प्रचंड मोठी झेप पाहायला मिळाली. सुरुवातीच्या प्राथमिक अंदाजानुसार, चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांतच १० ते १२ कोटी रुपयांचा टप्पा (Gross Collection) पार केला असून, अनेक मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीनवरील शोज सलग ‘हाऊसफुल’ (Housefull) धावत आहेत. स्वामी भक्तांची वाढती गर्दी आणि उदंड प्रतिसाद पाहता, पहिल्या आठवड्यातच हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील कमाईचे अनेक मोठे रेकॉर्ड्स मोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

प्रेक्षकांची प्रचंड उत्सुकता आणि स्वामी भक्तांच्या अलोट गर्दीत अखेर बहुप्रतिक्षित ‘Deul Band 2’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली असून, बहुतांश चित्रपटगृहांबाहेर ‘हाऊसफुल’ चे बोर्ड पाहायला मिळत आहेत. विज्ञान, अध्यात्म आणि शेतकऱ्यांच्या वास्तव प्रश्नांची सांगड घालणारी ही कलाकृती पहिल्याच दिवशी सुपरहिट ठरली आहे.

Pravin Tarde यांचे दमदार दिग्दर्शन

पहिल्या भागाप्रमाणेच Deul Band 2 चे दिग्दर्शन आणि लेखन प्रख्यात दिग्दर्शक-अभिनेते Pravin Tarde यांनी केले आहे. आपल्या अंगावर शहारे आणणाऱ्या संवादांसाठी आणि मातीशी जोडलेल्या कथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रवीण तरडे यांनी या भागातही दिग्दर्शनाची कमाल दाखवली असून, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात ते यशस्वी झाले आहेत. Deul Band च्या यशस्वी कामगिरीनंतर Deul Band 2 मध्ये प्रवीण तरडे नवीन काय दाखवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. अखेर प्रतीक्षा संपली व Deul Band 2 ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Deul Band 2 Star Cast (तगडी स्टारकास्ट)

या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांची फौज पाहायला मिळत आहे. प्रमुख कलाकारांची भूमिका वाखण्याजोगी झाली असून कलाकारांचे कौतुक होत आहे. Mohan Joshi as Swami Samarth पहिल्या भागाप्रमाणेच याही भागात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी ‘स्वामी समर्थांची’ हुबेहूब आणि तितकीच प्रभावी भूमिका साकारून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. प्रवीण तरडे यांच्या पत्नी Snehal Tarde: चित्रपटात त्यांनी मध्यवर्ती भूमिका (शेतकरी महिला ‘संगिता’) साकारली असून, त्यांचा अभिनय आणि देवावर प्रश्न उपस्थित करणारे संवाद चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी रंग भरला असून अभिनयाची छाप उमटवली आहे. याशिवाय Prasad Oak & Mahesh Manjrekar Sanskruti Balgude प्रसाद ओक, महेश मांजरेकर, संस्कृती बालगुडे व इतर कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी चित्रपटात महत्त्वाचा रंग भरला आहे. यामुळे Deul Band 2 प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे Box Office housefull च्या बॉर्डवरून दिसत आहे.

Deul Band 2 Audience Review & Public Response

चित्रपट पाहून बाहेर पडणारे प्रेक्षक भावूक होऊन अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. “विज्ञान की अध्यात्म? या प्रश्नाचे उत्तर आणि स्वामी भक्तीचा अनोखा सोहळा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहताना अंगावर काटा आला,” अशा भावना प्रेक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळचं शो हाऊसफुल्ल असून दिवसभरात Deul Band 2 show कडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत.

Deul Band 2 Day 1 Box Office Collection तीन दिवसात १ ० कोटीकडे वाटचाल

चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या (Movie Critics) मते, Deul Band 2 Advance Booking जोरदार झाली होती. पहिल्याच दिवशी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि साताऱ्यात सकाळपासूनच थिएटर्स बाहेर रांगा लागल्याने पहिल्या दिवशी हा चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करेल, अशी पूर्ण शक्यता होती. पहिल्या दिवशी अडीच कोटींचा व्यवसाय केल्यावर सलग दुसऱ्या दिवशीही तेवढेच कलेक्शन केले, वीकेंडला शनिवार ही गर्दी दुप्पट झाली व कलेक्शनही ४ कोटी ५ ० लाख झाले. त्यामुळे १ ० कोटीकडे वाटचाल कलेची असून आज Sunday blockbuster cinema होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर ‘स्वामींचा डंका’ वाजणार हे नक्की!

Deul Band 2, Deul Band 2 Box Office Collection, Deul Band 2 Day 1 Collection, Pravin Tarde, Mohan Joshi Swami Samarth, Deul Band 2 Marathi Movie, Deul Band 2 Review, Marathi Movie News, Entertainment News Marathi.

lagnaustav.com
lagnaustav.com

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू