BIG NEWS :हाती भगवा येताच कोरेगावात राजाभाऊ बर्गे ‘ॲक्शन मोड’मध्ये!

BIG NEWS :पालकमंत्र्यांच्या आदेशाने अवघ्या २४ तासांत निगडीचा जळालेला डीपी बदलला
कोरेगाव: BIG NEWS राजकारणात समाजकारणाची जोड असेल तर सामान्य जनतेचे प्रश्न किती वेगाने सुटू शकतात, याचा प्रत्यय कोरेगाव तालुक्यातील निगडी (रंगनाथ स्वामी) परिसरात आला आहे. सामाजिक कामात अग्रेसर असलेले राजाभाऊ बर्गे हे कोरेगावकराना परिचित आहेत नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेतल्यानंतर कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे आता थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून, निगडी येथील शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे वीज संकट त्यांनी अवघ्या २४ तासांत दूर केले आहे. अगोदरच ऍक्टिव्ह असलेल्या राजूभाऊंच्या ऍक्शन मोड मुळे सर्वसामान्य शेतकऱयांनी स्वागत केले.
नेमकी घटना काय?
निगडी परिसरातील अपशिंगे रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोरील महावितरणचा ट्रान्सफॉर्मर (डीपी) उच्च दाबामुळे शुक्रवारी सायंकाळी अचानक जळाला. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर डीपी जळाल्याने संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. भाजीपाला, ऊस आणि इतर उभी पिके पाण्यावाचून जळून जाण्याची भीती निर्माण झाल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता.
बर्गे यांची ‘सुपरफास्ट’ हालचाल
शेतकऱ्यांनी ही समस्या विजयराव जगताप यांच्या माध्यमातून राजाभाऊ बर्गे यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राजाभाऊ बर्गे आणि जगताप यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट पाटण गाठले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नवीन डीपी तातडीने बसवण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
पालकमंत्र्यांचा ‘ऑन द स्पॉट’ आदेश
प्रशांत बर्गे यांची आक्रमक आणि आग्रही भूमिका पाहून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तात्काळ महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. अमित बारटक्के यांना दूरध्वनीवरून कडक आदेश दिले. पालकमंत्र्यांचा आदेश मिळताच महावितरणचे प्रशासनही कामाला लागले आणि अवघ्या २४ तासांच्या आत नवीन ट्रान्सफॉर्मर निगडीत पोहोचला.
रविवारी सकाळीच वीजपुरवठा पूर्ववत
जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलून रविवारी सकाळी ११ वाजता नवीन डीपी कार्यान्वित करण्यात आला. त्यामुळे पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रविवारी दुपारी राजाभाऊ बर्गे यांच्या उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या नवीन डीपीचे लोकार्पण करण्यात आले.
“शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हेच कर्तव्य” – राजाभाऊ बर्गे
यावेळी बोलताना राजाभाऊ बर्गे म्हणाले की, “शिवसेना ही सामान्यांची आणि शेतकऱ्यांची संघटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आम्ही न्याय देत आहोत. निगडी येथील प्रश्न तातडीचा होता, तो मार्गी लागल्याने समाधान वाटले.”
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक मुन्नाभाई काझी, विजय जगदाळे, विजयराव जगताप, माजी सैनिक शिवाजी जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान, काम फत्ते झाल्यानंतर राजाभाऊ बर्गे यांनी ज्योतिबा मंदिरात जाऊन दख्खनच्या राजाचे दर्शन घेत गावाच्या प्रगतीसाठी साकडे घातले.












