Funds Controversy 2026 : निधी वाटपात दुजाभाव, भाजपच्या पंचायत समिती सदस्यांवर निधीसाठी आंदोलनाची वेळ! अनिता भोईटेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

Funds Controversy 2026 : निधी वाटपात दुजाभाव, भाजपच्या  पंचायत समिती सदस्यांवर निधीसाठी आंदोलनाची वेळ! अनिता भोईटेंचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

कोरेगाव | महाराष्ट्र वन वृत्तसंस्था

Funds Controversy 2026  देश, राज्य आणि सातारा जिल्ह्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कोरेगाव पंचायत समितीतील वाठार स्टेशन गणाच्या महिला सदस्या अनिता भोईटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) गंभीर आरोप केले आहेत. पंचायत समितीच्या निधी वाटपात दुजाभाव केला जात असून महिला सदस्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या त्रासाबाबत तत्काळ सुधारणा न झाल्यास लवकरच तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा सद्स्यां अनिता भोईटे यांनी कोरेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी बोलताना अनिता भोईटे म्हणाल्या की, “कोरेगाव पंचायत समितीच्या निधी वाटपात वाठार स्टेशन गणावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे. राष्ट्रवादी सदस्यांना जास्त निधी व भाजप सेनेच्या सदस्यांना कमी निधी दिला जात आहे त्यामुळे माझ्या वाठार स्टेशन गणातील विविध विकास कामे रखडली आहेत वास्तविक १५ व्या वित्त आयोगातील ७० लाख रुपयांचा निधी हक्काचा असताना, फक्त २३ लाख रुपये मंजूर करून मोठा दुजाभाव करण्यात आला आहे. राष्ट्रवादी पंचायत समितीतील सत्तेचा गैरवापर करीत आहे, निधीचे वाटप हे राजकीय पक्ष पाहून न करता प्रत्यक्ष गरज आणि नियमानुसार झाले पाहिजे. न्याय न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडू.”

पत्रकारांना मज्जाव आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा निषेध

पत्रकार परिषदेत अनिता भोईटे यांनी केवळ निधी वाटपातील अन्यायावरच नव्हे, तर प्रशासकीय कामकाजावरही बोट ठेवले. कोरेगाव मधील पत्रकारांना पंचायत समितीच्या कामकाजाची माहिती देण्यास टाळाटाळ करणे आणि मासिक सभेत बसण्यास विरोध दर्शवणे, या प्रकाराचा त्यांनी जाहीर निषेध नोंदवला.

लोकशाही तत्वाने कामकाज चालवण्यासाठी मासिक बैठकीत पारदर्शकता असावी यासाठी पत्रकार वार्तांकनासाठी उपस्थित राहतात कारण ते लोकांचे सभागृह आहे अशावेळी पत्रकारांना मज्जाव करुन सत्ताधारी राष्ट्रवादी पक्ष मनमानी करीत आहे. तसेच आपल्या अधिकारांचा गैरवापर करत स्वतःच्या सदस्यांना भरीव निधी देऊन विरोधी सदस्यांच्या विकासकामांना खो घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी याबाबतचे पत्र त्यांनी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांना देत यावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.

सध्या कोरेगाव पंचायत समितीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. या पंचायत समितीत भाजपच्या वाठार स्टेशन गणातून अनिता भोईटे या एकमेव महिला सदस्य निवडून आल्या आहेत, तर शिवसेना (शिंदे गट) यांची एक महिला सदस्य आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे एकूण ९ सदस्य असल्याने त्यांची सत्ता आहे. या पत्रकार परिषदेला वाठार स्टेशनचे माजी उपसरपंच संजय भोईटे आणि सेवा सोसायटीचे चेअरमन बळीराम काळोखे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू