पिंपोडे येथे ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यान,वाचन,निबंध, वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद..

पिंपोडे येथे ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यान,वाचन,निबंध, वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद..

छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालयाचा अभिनव उपक्रम

मोबाईलच्या दुनियेत वाचन मागे पडत चालले आहे. जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी सकारात्मक पुस्तके वाचनात आली पाहिजेत, वाचन साहित्याने संस्कारक्षम पिढी घडण्यास मदत होते असे मत उपसरपंच रंजीत लेंभे यांनी व्यक्त केले.

पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती शिवाजीराजे ग्रंथालय यांच्यावतीने वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत यशवंतराव चव्हाण विद्यालय, शंकरराव जगताप महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आलेल्या व्याख्यानासह वाचन,निबंध,वक्तृत्व स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी श्री.लेंभे बोलत होते. कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच दिपिका लेंभे, मुख्याध्यापक विनायक लटके, पर्यवेक्षक रामभाऊ दगडे, जिमखाना असोसिएशनचे अध्यक्ष संदीप कदम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबर निकम, ग्रंथालयाचे अध्यक्ष रणजित लेंभे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,पेन व शालेय साहित्य बक्षीस देण्यात आले.ग्रंथपाल संजय शेळके,चंद्रकांत साळुंखे,प्रतिभा कुंटे यांचे सहकार्य लाभले. शंकरराव जगताप महाविद्यालयात प्रा.अनिल अहिवळे यांचे ग्रंथ व लेखक आपल्या भेटीला या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. उपप्राचार्य डॉ.व्ही.व्ही.घाडगे,ग्रंथपाल प्रा.प्रवीण कुंभार यांचे सहकार्य लाभले. जिल्हा परिषद शाळेत केंद्रप्रमुख अनिलकुमार खुडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक रणजितकुमार निकम, संतोष यादव,सचिन जाधव, रमेश चव्हाण सर यांचे सहकार्य लाभले. ग्रंथालयाच्या ग्रंथपाल आशा पोतेकर यांनी आभार मानले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू