world championship
World Championship भारतासह दहा देशांचा चॅम्पियनशिपमध्ये सहभाग
World Championship; स्केटींग क्रीडाप्रकारातील मानाच्या इंडोरन्स वर्ल्ड चॅम्पियन्सशिप मध्ये अर्चित अनिल दीक्षितने यशाचा तिरंगा फडकावत ब्रॉन्झ मेडलला गवसणी घातली व देशाची मान उंचावली. त्याने १४ वर्षाखालील वयोगटात दोन ब्रॉन्झ मेडल जिंकली. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे येथे यंदाची इंडोरन्स वर्ल्ड चॅम्पियन्सशिप स्पर्धा World Championship पार पडली. या स्पर्धेत भारतसह युएई, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, मालदीव, सेनेगल, केनिया, फिलिपिन्स या देशांचा सहभाग होता. यामध्ये १४ वर्षाखालील वयोगटात अर्चित अनिल दीक्षितने दमदार कामगिरी केली व भारतासाठी दोन ब्रॉन्झ मेडल जिंकली.
अर्चित अनिल दीक्षित याचे त्याचे मुळगाव सातारा जिल्ह्यातील पिंपोडे खुर्द आहे. सध्या तो कामोठेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचा विदयार्थी असून इयत्ता आठवीत शिकत आहे. त्याची स्केटिंगमधील आवड लक्षात घेत आई रश्मी व वडील अनिल यांनी अर्चितला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. अर्चितचे वडील अनिल दीक्षित हे टूर्सचा व्यवसाय सांभाळतात तर आई रश्मी या गृहणी आहेत. अर्चितला स्केटिंगसाठी प्रशिक्षक दशरथ बंद यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वीही अर्चितने स्केटिंगच्या जिल्ह्यातील,राज्यातील व देशपातळीवर स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. इंडोरन्स वर्ल्ड चॅम्पियन्सशिप मधील त्याच्या यशाचे कौतुक होत आहे.
व्हिडिओ वृत्त पहा येथे क्लिक करा महाराष्ट्र वन न्यूज यु ट्यूब
ही बातमी पण वाचा आजची ताजी बातमी







