Finance: देशातील ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक’ म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार’

Finance: देशातील ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक’ म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘बँको ब्ल्यु रिबन पुरस्कार’

Finance: देशात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव !

Finance :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सहकारी बँकिंग क्षेत्रातील ठेव संकलानामधील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘बँको ब्लू रिबीन अवॉर्ड २०२४’ प्रदान करण्यात आला. अँबी व्हॅली सिटी, लोणावळा येथे, २८ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झालेल्या बँको अॅडव्हानटेज अॅन्यूअल समिट, २०२५ या भव्य समारंभात सदर पुरस्कार अविज पब्लीकेशनचे मुख्य संपादक श्री. अविनाश शिंत्रे गुंडाळे, गॅलेक्सी इन्माचे संचालक श्री. अशोक नाईक यांचेमार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे मुख्य महाव्यवस्थापक श्री. भारगेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेच्या वतीने संचालिका सौ. कांचनताई साळुंखे, श्री. रामराव लेंभे, श्री. सुरेश सावंत, श्री. लहूराज जाधव, सेवक संचालक श्री. संग्रामसिंह जाधव आणि विकास अधिकारी श्री.सचिन अनपट यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार सातारा जिल्हा बँकेस या पुरस्काराने सन्मानित केले. बँको, देशभरातील जिल्हा बँका, अर्बन बँका, ग्रामीण बँका या सहकारी क्षेत्रातील बँकांचे कामाचे मुल्यमापन बँकोचे ज्युरीमार्फत करुन दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूणच उत्कृष्ठ कामकाज आणि रुपये १० हजार कोटीचे वर ठेवी असलेल्या देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून सातारा जिल्हा बँकेची देशात प्रथम क्रमांकाचे पुरस्कारासाठी निवड करून सन्मानित करणेत आले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेल्या ७६ वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण, शेती, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्रांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. बँकेच्या सातत्यपूर्ण विकासात्मक योगदानामुळे तिला आजवर अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
श्री. भारगेश्वर बॅनर्जी यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख केला.
या पुरस्कारांमुळे बँकेच्या लौकीकामध्ये आणखी भर पडली आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली असलेचे मत बँकेचे अध्यक्ष मा. खा. श्री. नितिन पाटील यांनी व्यक्त केले. बँको ब्लू रिबीन अवॉर्ड हा देशपातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार असून, बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीची ही मोठी पोहोच पावती आहे.
या पुरस्काराबद्दल बँकेचे संचालक व सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मा. श्री. मकरंद पाटील, संचालक व मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे माजी सभापती मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे श्री. राजेंद्र भिलारे बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, गट सचिव व मान्यवरांनी अभिनंदन केले व बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Finance, Financial news,

IMG 20250122 WA0012

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)