शेती पंपाला ठरली तेवढी लाईट द्या, अन्यथा वीज कार्यालयाला टाळे

शेती पंपाला ठरली तेवढी लाईट द्या, अन्यथा वीज कार्यालयाला टाळे

वाठार स्टेशन महावितरण कार्यालयास शेतकरी संघटनेचा इशारा

राज्यातील शेकऱ्यांना शेती पंपासाठी दररोज 8 तास वीज द्यावी असे शासनाचे आदेश असताना या आदेशाला हरताळ फासत कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावात महावितरण कंपनीचे कर्मचारी 8 तासातील दररोज 3 ते 4 तास लाईट बंद ठेवत असल्याने या भागातील शेतात उभी असणारी पीक पाणी वाळत आहेत यासाठी शासनाने जेवढी 8 तास वीज जाहीर केली आहे तेवढी द्यावी अन्यथा वाठार स्टेशन महावितरण कार्यालयास टाळे ठोकणार असल्याचा इशारा कोरेगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या भागतील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिला आहे.

वाठार स्टेशन येथे वीज वितरणचे उप अभियंता कार्यालय आहे. या भागातील ग्राहक व शेतकऱ्यांना तक्रारीसाठी या ठिकाणी यावे लागते. शेतीसाठीची वीज ८ तास मिळेल अशा सूचना असताना वाठार स्टेशन, तळिये, देऊर, बिचुकले, विखळे, नलवडेवाडी अशा भागातील शेतकऱ्यांना दररोज फक्त चार ते पाच तास वीज मिळते. दररोज लोड वाढलाय यामुळे वीज खंडित झाली अशा विविध कारणांनी हक्काची वीज मिळत नाही . यामुळे हातातोंडाशी आलेली पिके करपून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे अशावेळी पाठपुरावा करून क्षमता वाढवण्याची उपाययोजना करण्याची जबाबदारी उप अभियंता यांची होती त्यामुळे शेतकऱयांची तीव्र मागणी लक्षात घेता वीज वितरण कंपनीने क्षमता वाढवून १ ५ दिवसाच्या आत उपाययोजना करुन शेतीसाठी दररोज ८ तास नियमित वीज द्यावी अन्यथा शेतकरी संघटना वाठार स्टेशनच्या वीज कार्यालयाला टाळे टोकणार अशा आशयाचे निवेदन शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांचे नेतृत्वाखाली वीज उप अभियंता अरुण पवार यांना दिले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरणाच्या विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडले.

यावेळी कुमार भोईटे , सुधीर अडागळे , संजय माने , कपिल चव्हाण, विक्रम चव्हाण, महादेव पवार , दिलीप पवार , शिवाजी पवार , सुरेश पवार, संतोष यादव , कौस्तुभ अहिरेकर, सुभाष अहिरेकर , संदीप मतकर, प्रशांत अहिरेकर , संजय पवार , हरिदास पवार , लक्ष्मण शिंदे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prabhukrupa Automobiles

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू