छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या निरा शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर समारंभ उत्साहात

छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या निरा शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर समारंभ उत्साहात

सातारा/प्रतिनिधी,

१५०० कोटी एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्या निरा येथील शाखेचा लॉकर सुविधेसह स्वमालकीच्या इमारतीत स्थलांतर समारंभ दिपावलीच्या मुहूर्तावर उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी निरा शिवतक्रार गावच्या प्रथम नागरिक सौ.तेजश्री विराज काकडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व सल्लागार राजेंद्र काका भोसले यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.ग्रामिण भागात स्थापन होऊन शहरांकडे झेपावणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने ८ विभागीय कार्यालयांचे माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात ५६ शाखाविस्तार केलेला आहे.सीबीएस प्रणालीचा अवलंब करून ग्राहकांना गतिमान व पारदर्शक सेवा, मोबाईल बॅंकिंग सुविधा देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या या संस्थेने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत १५०५ कोटी ८५ लाख संमिश्र व्यवसायाची भरारी घेतली आहे.एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत १४६ कोटी ६७ लाख व्यवसाय वाढ केलेली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी काढले.

कार्यक्रमास चेअरमन डॉ.सोपानराव चव्हाण,ज्येष्ठ संचालक सुरेशबापू साळुंखे,अशोकआबा लेंभे,हणमंत निकम,भरत साळुंखे,तात्यासाहेब ढमाळ, शशिकांत कुंभार,सतीश बिचुकले, नारायण सोनवणे,सत्यवान मतकर,निरा शाखेचे सल्लागार उदय ढमाळ, उदय काकडे,सतीश शिंदे, आबासाहेब थोपटे,संपत थोपटे, उपसरपंच सदस्य संदीप धायगुडे, कांचन निगडे,दिलीपआबा चव्हाण, मंगेश ढमाळ,हनुमंत थोपटे,संपत निगडे,आयडीबीआय बँक,ज्ञानदीप पतसंस्था,शिवकृपा पतसंस्था,पुरंदर पतसंस्था,मानदेशी महिला पतसंस्थेचे सेवक वर्ग,जयवंत थोपटे, विभागीय विकास अधिकारी महेश कदम,शाखाप्रमुख नवनाथ लेंभे,शाखेतील सेवक,सभासद, ग्राहक, ग्रामस्थ उपस्थित होते.

संभाजी महाराज पतसंस्था

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू