बारामती MIDC परिसरात आता CCTV ची ‘करडी नजर’

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची ‘करडी नजर’

बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि कंपन्याच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम

बारामती एमआयडीसी, तांदुळवाडी बौद्ध विहार आणि काटेवाडीत ५७ सीसीटीव्ही कॅमेरे,

पोलीस निरीक्षक यांच्या कल्पनेतून ८,७०,००० रु चे CCTV बसविण्यात आले.

बारामती : नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी CCTV camera कॅमेरे प्रणाली चा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यास तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या शुभारंभ कार्यक्रमाला एमआयडीसीचे विभागीय कार्यकारी अधिकारी हनुमंतराव पाटील, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, CCTV साठी मदत करणारे अभिजित शिंदे (बारामती कॅटल फीड)धायगुडे, श्रीधर घुले (उपसरपंच काटेवाडी), तांदूळवाडी दिगम्बर बेलदार, काटेवाडी पोलीस पाटील, कृष्णा ताटे,BIDA बारामतीचे अध्यक्ष धनंजय जामदार व पदाधिकारी, उद्योजक तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती एमआयडीसी मधील कॅमेरे बसविण्यासाठी बारामती कॅटल फीड आणि कृष्णा ताटे, तांदुळवाडी बौद्ध विहारातील कॅमेरासाठी दिगंबर बेलदार आणि काटेवाडी येथील कॅमेऱ्यासाठी श्रीधर घुले यांनी मदत केली. सीसीटीव्ही साठी योगदान दिलेल्या सर्वांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सध्या वाढत असलेल्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे, गुन्ह्यांची उकल जलद गतीने करणे आणि अपघात अथवा आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.

बारामती MIDC परिसरातील प्रमुख चौक, औद्योगिक क्षेत्र, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील भागांमध्ये टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार असल्याची माहिती यावेळी पोलीस निरीक्षक यादव यांच्याकडून देण्यात आली. या उपक्रमासाठी विविध कंपन्या आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत सहकार्य दर्शवले असून पोलिस प्रशासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील समन्वयाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नागरिकांनी देखील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. “सीसीटीव्ही प्रणालीमुळे केवळ गुन्हेगारांवर वचक निर्माण होणार नाही तर नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल,” असे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाचे बारामती परिसरातून स्वागत करण्यात येत असून भविष्यात आणखी ठिकाणी आधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा मानस संबंधित संस्थांनी व्यक्त केला.

हे कॅमेरे बसविण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे निलेश वाकळे नितीन ढवण यांनी विशेष प्रयत्न केले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू