Satara Lonand Road Accident : दैव बलवत्तर अपघातामध्ये वाचला मुलगा! देऊर बसस्थानकात भरधाव ट्रक घुसला; भीषण धडकेत एसटी स्टॅंडसह उपहारगृह जमीनदोस्त… मोठा अनर्थ टळला

Satara Lonand Road Accident : दैव बलवत्तर अपघातामध्ये वाचला मुलगा! देऊर बसस्थानकात भरधाव ट्रक घुसला; भीषण धडकेत एसटी स्टॅंडसह उपहारगृह जमीनदोस्त… मोठा अनर्थ टळला

महामार्गावर गतिरोधक व सिग्नल बसवण्याची देऊर ग्रामस्थांची मागणी

सातारा/ महाराष्ट्र वन न्यूज

Satara Lonand Road Accident सातारा-लोणंद राज्यमार्गावर आज सोमवारी भल्या पहाटे एक भीषण अपघात घडला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक मालवाहू अवजड ट्रक भरधावपणे अनियंत्रित होऊन थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. या भीषण धडकेने अपघातात बसस्थानकासह उपहारगृहा(कॅन्टीन) पूर्णपणे जमीनदोस्त झाले. यात कँटीनचे मोठे नुकसान झाले असून दुकानाचे पत्रे व साहित्याचा चकनाचूर झाला आहे. सुदैवाने, अपघात घडला त्या क्षणी उपहारगृहात असलेला कँटीन चालक समीर मांढरे यांचा मुलगा प्रसंगावधान राखून वेळेवर सावध झाल्याने अपघातामधून बालबाल सुखरूप वाचला.

पहाटेची वेळ ठरली वरदान

देऊर हे परिसर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र तसेच प्रसिद्ध देवस्थान असल्याने या बसस्थानकावर दररोज शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, भाविक आणि प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. सुदैवाने, हा अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने बसस्थानक परिसरात गर्दी नव्हती. जर हाच अपघात ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच दिवसा घडला असता, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.

गतिरोधकांची मागणी; ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

सध्या सातारा-लोणंद मार्गाचे रुंदीकरण झाले आहे यामुळे यावर वाहने भरधाव वेगाने जात आहेत, वाहनांची प्रचंड गती आणि वारंवार होणारे छोटे-मोठे अपघात पाहता, वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर देऊर बसस्थानक परिसरात तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर), स्पीड कॅमेरा आणि योग्य सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी स्थानिक देऊर ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास राज्यमार्गावर तीव्र स्वरूपाचा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देऊर ग्रामस्थांनी दिला आहे.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू