Wildlife Rescue शहापूरमध्ये मशीनने ऊसतोड सुरू असताना शेतात असं काही दिसलं की कामगारांची उडाली भंबेरी; वनविभागही चक्रावला!

Wildlife Rescue शहापूरमध्ये मशीनने ऊसतोड सुरू असताना शेतात असं काही दिसलं की कामगारांची उडाली भंबेरी; वनविभागही चक्रावला!

सातारा/प्रतिनिधी

Wildlife Rescue कोरेगाव तालुक्यातील शहापूर येथे मशीनद्वारे ऊसतोड सुरू असताना ऊसाच्या शेतात बिबट्याची दोन पिल्ले अचानक आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ऊसतोड सुरू असताना ही पिल्ले निदर्शनास आल्यानंतर कामगारांची व स्थानिकांची मोठी भंबेरी उडाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनविभाशी संपर्क साधला, तर घटनास्थळावरील प्रकार पाहून वनविभागही चक्रावला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही पिल्ले सुरक्षितपणे ताब्यात घेतली.

परिसरात भीतीचे वातावरण; मादीच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी विशेष नियोजन

शहापूर परिसरात यापूर्वीही रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा शेतकरी व ग्रामस्थांमध्ये होती. आता प्रत्यक्ष ऊसाच्या शेतातच बिबट्याची दोन पिल्ले आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आढळलेली दोन्ही पिल्ले अवघ्या सात ते आठ दिवसांची आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या आईपासून वेगळे न ठेवता आढळलेल्या मूळ ठिकाणीच सुरक्षित ठेवण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे. या परिसरात ट्रॅप कॅमेरे (Camera Traps) लावून बिबट्याच्या मादीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मादीने आपल्या पिल्लांना सुरक्षितपणे घेऊन जावे, यासाठी वनविभाग प्रयत्नशील असून नैसर्गिक अधिवासातच पिल्लांचे संगोपन व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहापूरसह परिसरातील डोंगर भागातील बऱ्याच गावांत बिबट्याचा वावर असल्याने वनविभागाने या भागात विशेष लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

७० टक्के बिबट्यांचा ऊसाच्या फडात अधिवास!

महाराष्ट्रात बिबट्यांच्या अधिवासात मोठा बदल होत असून, तब्बल ७० टक्के बिबटे ऊसाच्या फडात (Sugarcane Field Habitat) राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जंगलांचे कमी होणारे क्षेत्र आणि मानवी वस्त्यांचा विस्तार यामुळे बिबट्यांनी ऊसशेतीला आपला नवीन अधिवास बनवले आहे. ऊसाच्या फडात जन्मलेली पिल्ले मानवी आवाज व वावराला सरावलेली होत असल्याने आगामी काळात मानव-बिबट्या संघर्षाचा (Human-Wildlife Conflict) धोका वाढण्याची शक्यता वन्यजीव तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू