Rahul Gandhi Protest Delhi दिल्लीत राहुल गांधींचा हायव्होल्टेज ड्रामा! निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर ‘इंडिया’ आघाडीचे महाआंदोलन, पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून फडकवला राष्ट्रध्वज;

Rahul Gandhi Protest Delhi दिल्लीत राहुल गांधींचा हायव्होल्टेज ड्रामा! निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर ‘इंडिया’ आघाडीचे महाआंदोलन, पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून फडकवला राष्ट्रध्वज;

नवी दिल्ली /विशेष प्रतिनिधी

Rahul Gandhi Protest Delhi निवडणूक आयोगाच्या (ECI) कारभारावर, पारदर्शकतेवर आणि मतदार यादीतील कथित फेरफारांवरून (SIR प्रकरण) आज देशाच्या राजधानीत विरोधकांनी आक्रमक होत मोठे शक्तीप्रदर्शन केले. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीतील १४० हून अधिक खासदारांनी Rahul Gandhi यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनापासून ते थेट ‘निर्वाचन सदन’ (निवडणूक आयोग मुख्यालय) असा धडक मोर्चा काढला. आणि आताचे ताजी माहिती हाती येईपर्यँत त्यांनी आता निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेर गेटसमोर ठिय्या दिला आहे.

या महामोर्चाचे नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वड्रा, आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी केले.

बॅरिकेड्सवर चढून फडकवला तिरंगा

निर्वाचन सदनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिल्ली पोलिसांनी शेकडो जवानांचा ताफा तैनात केला होता. सुरक्षेचे कारण देत पोलिसांनी मोर्चा अडवण्यासाठी प्रचंड मोठे लोखंडी बॅरिकेड्स उभारले होते. पोलिसांच्या अटकावामुळे विरोधक आणि पोलिसांमध्ये मोठी बाचाबाची झाली.

त्याच वेळी आंदोलनाला नवे वळण मिळाले—विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून हातातील राष्ट्रध्वज (तिरंगा) उंचावला आणि जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधींचा हा आक्रमक अंदाज पाहून संपूर्ण परिसर ‘लोकशाही वाचवा’ आणि ‘निवडणूक आयोग हाय-हाय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

आकाशवाणी भवनाबाहेर धरणे आंदोलन

पोलिसांनी रस्ता पूर्णपणे बंद केल्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव आणि के. सी. वेणुगोपाल यांच्यासह सर्व खासदार रस्त्यावरच आणि लगतच्या आकाशवाणी भवन परिसराबाहेर धरणे आंदोलनाला बसले.

यावेळी माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “हा लढा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा खुर्चीचा नसून देशाचे संविधान आणि ‘एक व्यक्ती, एक मत’ (One Person, One Vote) हा अधिकार वाचवण्याचा आहे. निवडणूक आयोग ६४% जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांची साधी भेट घ्यायलाही तयार नाही. पोलिसांच्या बळाचा वापर करून लोकांचा आवाज दाबता येणार नाही.”

अखिलेश यादव यांचा थेट भाजपवर निशाणा

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. पोटनिवडणुकांमध्ये आणि मतदार याद्यांमधून ठराविक मतदारांची नावे वगळून (SIR घोटाळा) फेरफार केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिलेला नसून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.

‘इंडिया’ आघाडीच्या मुख्य ३ अधिकृत मागण्या:

  1. मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता संपुष्टात आल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा.
  2. पारदर्शक मतदार यादी: मतदार याद्यांमधून नावे कट करण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवून सर्व अद्ययावत याद्या सार्वजनिक कराव्यात.
  3. बॅलट पेपरवर निवडणुका: ईव्हीएमवर (EVM) शंका उपस्थित करत आगामी सर्व प्रमुख निवडणुका बॅलट पेपरवर घेण्यात याव्यात.

सुमारे दोन तास चाललेल्या या हायव्होल्टेज आंदोलनानंतर, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी प्रयत्न केले त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक खासदारांसह निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या गेटबाहेर वटवृक्षच्या झाडाखाली बैठक मारली व ठिय्या दिला आहे यामुळे दिल्लीत वातावरण तापले आहे, आंदोलनामुळे ल्युटियन्स दिल्लीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रीय स्तरावरील या घडामोडीमुळे आगामी निवडणूक काळातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू