Deur Mudhaidevi Temple विरोधकांकडून त्यांचे ‘खाजगी ट्रस्ट’ मुधाईदेवी मंदिराचे असल्याचे भासवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न; पत्रकार परिषदेत गुलाबसिंग कदम यांचा आरोप

Deur Mudhaidevi Temple विरोधकांकडून त्यांचे ‘खाजगी ट्रस्ट’ मुधाईदेवी मंदिराचे असल्याचे भासवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न; पत्रकार परिषदेत गुलाबसिंग कदम यांचा आरोप

प्रशासकाला विरोधकांच्या खाजगी ट्रस्टच्या ‘त्या’ शेतजमिनीच्या जागेत बसवण्याची ग्रामस्थांची मागणी

देऊरच्या श्री मुधाईदेवी मंदिराच्या मालमत्तेवरून वाद; गुलाबसिंग कदम यांच्यासह ग्रामस्थांनी घेतली पत्रकार परिषद

सातारा / प्रतिनिधी 

देऊर (ता. कोरेगाव) येथील Deur Mudhaidevi Temple ऐतिहासिक श्री मुधाईदेवी देवस्थानच्या मालमत्ता आणि जमिनीच्या हक्कांसंदर्भात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. काही व्यक्तींनी स्थापन केलेले ट्रस्ट हे पूर्णपणे खाजगी ट्रस्ट आहेत. शेतजमिनी दाखवून नोंद केलेले हे ट्रस्ट मूळ श्री मुधाईदेवी मंदिराचेच असल्याचे भासवून विरोधकांकडून ग्रामस्थ व भाविकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देऊर येथील ग्रामस्थ गुलाबसिंग कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला. या खाजगी ट्रस्टच्या आडून मंदिराची मूळ मालमत्ता आणि गोरगरीब, बारा बलुतेदारांच्या जमिनींवर हक्क सांगण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत कागदपत्रे सादर करताना ओंकार पोरे यांनी माहिती दिली की, देऊर येथील श्रीमंत रघुजीराजे भोसले यांची संपूर्ण अचल संपत्ती—ज्यामध्ये श्री मुधाईदेवी मंदिर, आजूबाजूचा परिसर, राजवाडा आणि शेतजमीन समाविष्ट आहे—ही नागपूर येथील ‘मॅनेजर कोर्ट ऑफ वॉर्ड्स’च्या नियंत्रणाखाली आहे. नागपूर तहसीलदार तथा मॅनेजर, कोर्ट ऑफ वॉर्ड्स यांच्या दि. १९/०८/२०२६ रोजीच्या अधिकृत पत्राचा (FD No. 16/1961) दाखला देत, ही मालमत्ता सहदिवाणी न्यायालय नागपूर येथे प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विरोधकांनी स्वतःच्या खाजगी शेतजमिनीचे ट्रस्ट दाखवून मूळ मंदिरावर प्रशासक आणल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ही बाब ग्रामस्थांवर अन्याय करणारी असल्याचे सांगत, मंदिरातून प्रशासक रद्द करावा किंवा प्रशासकाला मुख्य मंदिरात न बसवता विरोधकांच्या त्या खाजगी ट्रस्टच्या ७ /१ २ वर असलेल्या शेतजमिनीच्या जागेत बसवावे आणि श्री मुधाईदेवी मंदिर लवकरात लवकर प्रशासकमुक्त करावे, अशी आग्रही मागणी गुलाबसिंग कदम व ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना शांताराम दोरके म्हणाले की, सुरुवातीला गावातील काही व्यक्ती केवळ देवीला तेल, साडी-चोळी अर्पण करणे आणि धार्मिक सेवा करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्या होत्या. त्यासाठी त्यांना काही शेतजमिनी देण्यात आल्या होत्या. मात्र, पुढे याच लोकांनी त्या शेतजमिनींचे दोन स्वतंत्र खाजगी ट्रस्ट तयार केले. आता हेच ट्रस्ट मुख्य मंदिराचे मालक असल्याचा आव आणत मंदिर व मालमत्तेवर अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. वास्तविक मंदिर व परिसर आजही भोसले घराण्याच्या अधिकारात असताना या ट्रस्टमुळे दिशाभूल होत असल्याने, दोन्ही खाजगी ट्रस्टच्या स्थापनेची, नोंदणीची आणि मालमत्तांवरील अधिकारांची धर्मादाय विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सातारा येथील तत्कालीन सहधर्मादाय आयुक्तांच्या कार्यकाळातील प्रशासकीय निर्णयांवर आणि प्रशासक नियुक्तीच्या प्रक्रियेवर  मंगेश गुरव यांनी तीव्र आक्षेप नोंदवले. पूर्वीच्या कारवाईत ग्रामस्थांचे म्हणणे न ऐकता मुख्य मंदिरातील अधिकृत फलक हटवण्यात आले व नवीन फलक लावून देणग्या गोळा करण्यास सुरुवात झाली, असा आरोप त्यांनी केला. तथापि, सध्याच्या सहधर्मादाय आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामस्थांना या प्रकरणात पक्षकार म्हणून सामावून घेतले असून आपले म्हणणे ऐकून घेतल्याचे सांगत, आता सत्य समोर येऊन निष्पक्ष न्याय मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

हा वाद केवळ मंदिरापुरता मर्यादित नसून गावातील बारा बलुतेदार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शेतजमिनींवर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करत, महसूल अभिलेखांच्या आधारे नोंदींची पडताळणी करून गोरगरिबांच्या हक्कांचे रक्षण करण्याची मागणी मंगेश गुरव यांनी केली. दरम्यान, विरोधकांनी जनतेच्या न्यायालयात येऊन आपली नोंदणी कोणत्या सालची आहे, कोणत्या जमिनीची आहे आणि मंदिरावर कसला हक्क आहे हे सिद्ध करावे, असे खुले आव्हान गुलाबसिंग कदम आणि उपस्थित ग्रामस्थांनी या वेळी दिले.

या पत्रकार परिषदेला गुलाबसिंग बापू कदम, शांताराम दोरके, मंगेश गुरव, ओमकार पोरे, प्रीतम भांडवलकर, सागर कदम, सचिन कदम, राजेंद्र गुरव, नंदकुमार महामुनी, केशव देशमुख, ओंकार देशमाने, मच्छिंद्र गुरव, वसंत गुरव, दीपक पोरे, प्रसाद पोरे, डॉ. प्रियंका कदम आणि योगेश गुरव यांच्यासह देऊर येथील ग्रामस्थ, सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(या वृत्तातील सर्व आरोप, दावे, आक्षेप, मागण्या आणि वक्तव्ये ही पत्रकार परिषदेत उपस्थित ग्रामस्थांनी मांडलेली त्यांची भूमिका आहे. ‘महाराष्ट्र वन न्यूज’ने या दाव्यांची स्वतंत्रपणे सत्यता निश्चित केल्याचा दावा केलेला नाही. या प्रकरणात संबंधित ट्रस्ट, विरोधक किंवा प्रशासनाची बाजू या वेळी समोर आलेली नाही. त्यांची अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण प्राप्त झाल्यास तेसुद्धा ‘महाराष्ट्र वन न्यूज’वर वस्तुनिष्ठपणे प्रसिद्ध करण्यात येईल.)

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू