Wathar Station PHC Ambulance नागरिकांसाठी दिलासादायक! वाठार प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका आता अपघाती रुग्णांसाठी उपलब्ध;

Wathar Station PHC Ambulance नागरिकांसाठी दिलासादायक! वाठार प्राथमिक आरोग्य केंद्राची १०२ रुग्णवाहिका आता अपघाती रुग्णांसाठी उपलब्ध;

भाजप युवा नेते अमित भोईटे यांच्या पाठपुराव्याला यश

सातारा | Maharashatra One News

Wathar Station PHC Ambulance जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णवाहिका आतापर्यंत केवळ ठरावीक व विशिष्ट कामांसाठीच वापरल्या जात होत्या. मात्र, राज्य शासनाने २९ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, आता या रुग्णवाहिका अपघातग्रस्त नागरिकांसह सर्व गरजू रुग्णांसाठी तात्काळ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण सुविधेचा परिसरातील नागरिकांनी आणि अपघातग्रस्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अमित भोईटे यांनी केले आहे.

वाठार स्टेशन आरोग्य केंद्रातील बैठकीनंतर निर्णयाला गती

वाठार स्टेशन व परिसरात वाढते रस्ते अपघात विचारात घेता, प्राथमिक आरोग्य केंद्रात पायाभूत वैद्यकीय सुविधा आणि रुग्णवाहिका उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे बनले होते. काही दिवसांपूर्वीच अमित भोईटे यांनी वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील विविध अडचणींबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान त्यांनी रुग्णवाहिका सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट सूचना मांडल्या होत्या.

१०८ रुग्णवाहिकेच्या मागणीसोबतच सध्या उपलब्ध १०२ रुग्णवाहिका सेवेत!

राष्ट्रीय महामार्गावरील अपघात सत्र पाहता वाठार स्टेशन येथे शासनाची आपत्कालीन ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका मिळावी, यासाठी अमित भोईटे यांचे वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न सुरू आहेत. परंतु, राज्यभरातून १०८ रुग्णवाहिकांची मागणी जास्त असल्याने, सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पडून असलेली रुग्णवाहिका सर्वसामान्य व अपघातग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी तात्काळ वापरण्यात यावी, असा २९ एप्रिलचा शासन आदेश प्राप्त झाला आहे. अमित भोईटे यांनी या आदेशाची प्रत नुकतीच वाठार स्टेशन आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली असून, ही रुग्णवाहिका कोणत्याही विलंबाशिवाय सर्वांसाठी खुली करण्याचे निर्देश दिले आहेत.

आरोग्य मंदिरातील सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवणार: अमित भोईटे

“शासनाची सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आता ‘आरोग्य मंदिर’ या संकल्पनेतून ओळखली जात आहेत. या आरोग्य मंदिरातील वैद्यकीय सेवा व सुविधा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकाला आणि गरजू नागरिकाला सहज मिळाव्यात, यासाठी मी कटिबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून वाठार स्टेशन व परिसरातील आरोग्यविषयक समस्या टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपी सोडवण्यासाठी माझे काम अविरत सुरू राहील.”

अमित भोईटे (युवा नेते, भाजप – वाठार स्टेशन)

Prakash Raje

Prakash Raje

लेखक २० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून राजकीय, सामाजिक, टेक्नॉलॉजी, कला, साहित्य, लोकजीवन, पर्यटन अशा विविध पैलूवर लिखाण प्रसिद्ध आहे. तसेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार, वक्ते व सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू