Ganja Smuggling Pune Solapur Highway: ६.५४ कोटींचा तब्बल १३०९ किलो गांजा सोलापुरात जप्त, पुणे कस्टम्सची धडक कारवाई !

Ganja Smuggling Pune Solapur Highway: ६.५४ कोटींचा तब्बल १३०९ किलो गांजा सोलापुरात जप्त, पुणे कस्टम्सची धडक कारवाई !

पुणे | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था

Ganja Smuggling Pune Solapur Highway पुणे-सोलापूर महामार्गावर पुणे कस्टम्सच्या नार्कोटिक्स सेलने एक अत्यंत मोठी आणि मोठी कारवाई करत अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ओडिशाहून सोलापूरच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर होणारी गांजाची तस्करी उघडकीस आणत अधिकाऱ्यांनी तब्बल १३०९.०२ किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजे किंमत ६ कोटी ५४ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील हि मोठी कारवाई आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर मध्यरात्री सापळा

ओडिशातील गुनुपूर येथून सोलापूरकडे मोठ्या प्रमाणावर गांजाची वाहतूक होणार असल्याची टीप पुणे कस्टम्सच्या नार्कोटिक्स सेलच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी ६ व ७ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्री पुणे-सोलापूर महामार्गावर विशेष पाळत ठेवून सापळा रचला.

यादरम्यान सोलापूरजवळ संशयित महिंद्रा ट्रक (क्रमांक MH16DK5556) थांबवून त्याची पाहणी करण्यात आली. सदर अंमली पदार्थ प्लास्टिकच्या रिकाम्या क्रेट्सखाली अत्यंत हुशारीने लपवून ठेवण्यात आला होता. रस्त्यावर सविस्तर तपासणी करणे शक्य नसल्याने वाहन, चालक आणि पंच साक्षीदारांना पुढील कारवाईसाठी सोलापूर येथील कस्टम्स सीएफआर कार्यालयात आणण्यात आले.

४६ गोण्यांमधून ६३६ पॅकेट्स जप्त; एकाला कोठडी

एनडीपीएस (NDPS) अधिनियम १९८५ मधील तरतुदींनुसार वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत प्लास्टिक क्रेट्सखाली दडवलेल्या ४६ गोण्यांमधून गांजाची तब्बल ६३६ पॅकेट्स आढळून आली, ज्यांचे एकूण वजन १३०९.०२ किलोग्रॅम भरले. नार्कोटिक ड्रग फील्ड टेस्टिंग किटद्वारे तपासणी केली असता हा गांजाच असल्याचे स्पष्ट झाले.

कस्टम्सने ६.५४ कोटींच्या गांजासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला महिंद्रा ट्रक देखील जप्त केला आहे Ganja Smuggling Pune Solapur Highway या प्रकरणी एका आरोपीस तात्काळ अटक करून कोठडीत पाठवण्यात आले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, याचा पुढील तपास गतीने सुरु आहे अशी माहिती पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाचे अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंखे यांनी दिली आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू