Ajitdada Pawar Jayanti : स्व. अजितदादा पवार यांची जयंती :अंबवडे संमत कोरेगाव येथे रक्तदानातून सामाजिक बांधिलकी!

Ajitdada Pawar Jayanti : स्व. अजितदादा पवार यांची जयंती :अंबवडे संमत कोरेगाव येथे  रक्तदानातून सामाजिक बांधिलकी!

३६ जणांनी केले रक्तदान, दादांना आदरांजली

कोरेगाव / सातारा | महाराष्ट्र वन न्यूज वृत्तसंस्था

कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत कोरेगाव येथे स्व. अजितदादा पवार Ajitdada Pawar यांच्या जयंतीचे (जन्मदिन) औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साही व भावूक वातावरणात अभिवादन सोहळा आणि भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील तरुण वर्ग आणि ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला, तब्बल ३६ युवा रक्तदात्यांनी रक्तदान करून स्व. अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.

कार्यक्रमा दरम्यान आयोजित सभेमध्ये गावातील मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर आणि उत्कृष्ट कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. “दादांनी परिसराच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या आठवणी आणि त्यांनी घालून दिलेला विचारांचा वारसा अंबवडे गावातील ग्रामस्थांच्या मनात सदैव जिवंत आणि स्मरणात राहील,” अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

सातारा सिव्हिल हॉस्पिटलचे विशेष सहकार्य

स्व. अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तादानातून अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेले हे शिबीर सातारा सिव्हिल हॉस्पिटल (Satara Civil Hospital) यांच्या विशेष सहकार्यातून पार पडले. हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने रक्त संकलनाचे काम अत्यंत नियोजनबद्ध आणि सुरक्षित रीतीने पूर्ण केले. गावातील तरुण आणि रक्तदात्यांनी सकाळपासूनच या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गावच्या प्रथम नागरिकांसह ग्रामस्थांची उपस्थिती

या प्रेरणादायी आणि सामाजिक कार्यक्रमास अंबवडे संमत कोरेगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या नेत्याची जयंती साजरी केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे आणि सर्व ३६ तरुण रक्तदात्यांचे मनापासून कौतुक केले. तसेच यावेळी उपस्थितांचे, आयोजकांचे, रक्तदान शिबिरामधील मधील सर्व कर्मचाऱ्याचे, तसेंच 36 रक्तदात्यांचे जितेंद्र वाघ यांनी आभार मानले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू