Devendra Fadnavis Uddhav Thackeray Meet फडणवीस-ठाकरें एकत्र- दिवसभर चर्चेचा हवा’हवाई’ प्रवास

Devendra Fadnavis Uddhav Thackeray Meet फडणवीस-ठाकरें एकत्र-  दिवसभर चर्चेचा हवा’हवाई’ प्रवास

मुंबई/डेस्क

Devendra Fadnavis Uddhav Thackeray Meet महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काहीही घडू शकतं, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह दोन्ही बाजूचे प्रमुख नेते आज मुंबई ते नागपूर असा एकत्र विमान प्रवास करताना दिसले. फडणवीस-ठाकरें एकत्र विमान प्रवासाची दिवसभर हवा’हवाई’ चर्चा माध्यमामध्ये होती.

गेल्या काही काळापासून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड अस्थिर असून काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या ६ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, ज्यावरून ठाकरे गटाकडून भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली जात आहे. अशा अत्यंत तणावाच्या आणि कटुतेच्या वातावरणात राज्याचे दोन कट्टर विरोधक एकाच विमानात समोरासमोर आल्याने आणि त्यांनी एकत्र प्रवास केल्याने काल दिवसभर राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांमध्ये तर्क-वितर्कांचे पेव फुटले आहे.

या संपूर्ण ‘हवा हवाई’ प्रवासाबाबत नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर माध्यमांनी विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही तिघे एकत्र भेटलो हीच सध्याची सर्वात मोठी बातमी आहे’ असे अत्यंत सूचक आणि खळबळजनक विधान करत राजकीय चर्चांना अधिक हवा दिली आहे.

विमानात प्रवेश करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढे होऊन उद्धव ठाकरेंसोबत हस्तांदोलन केले आणि दोन्ही नेत्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांची आपुलकीने विचारपूस देखील केली. विदर्भातील फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे जात असतानाच हा अजब राजकीय योगायोग जुळून आला.

या दोन्ही बड्या नेत्यांच्या धक्कादायक विमानप्रवासावर आता दोन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिल्या असून भाजप आमदार प्रसाद लाड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा केवळ एक योगायोग असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही नेते आपापल्या पूर्वनियोजित कामासाठी नागपूरला जात होते आणि विमान एकच असल्याने ही भेट झाली, त्यामुळे या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असा पडदा टाकण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून केला जात आहे. परंतु, फडणवीस, ठाकरे आणि राऊत यांच्यातील या बंद दाराआडच्या विमान प्रवासाने आणि फडणवीसांच्या विधानाने पडद्यामागे काहीतरी मोठी राजकीय खिचडी शिजत असल्याच्या चर्चांना मात्र पूर्णविराम मिळालेला नाही. Devendra Fadnavis Uddhav Thackeray Meet

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू