SSC Result 2026 :यशाची परंपरा कायम! श्री मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊरचा दहावीचा निकाल ९६.१२%

SSC Result 2026 :यशाची परंपरा कायम! श्री मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊरचा दहावीचा निकाल ९६.१२%

कोरेगाव/ प्रतिनिधी : SSC Result 2026 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२६ च्या शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये श्री मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊर या विद्यालयाने आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत ९६.१२% निकाल लावला आहे.

SSC Result 2026
संचिता उमेश शिंदे
WhatsApp Image 2026 05 09 at 6.39.54 PM
तनुष्का संजय पवार
WhatsApp Image 2026 05 09 at 6.39.53 PM
मृणाल राहुल शिंदे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या फेब्रुवारी/मार्च २०२६ च्या शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत श्री मुधाईदेवी विद्यामंदिर, देऊरने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९६.१२% लागला असून, देऊर केंद्रात व विद्यालयात आसनगाव येथील कुमारी संचिता उमेश शिंदे हिने ९५.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, बिचुकले येथील कुमारी तनुष्का संजय पवार ९३.४०% गुणांसह द्वितीय, आसनगावची मृणाल राहुल शिंदे ९३.००% गुणांसह तृतीय, देऊर येथील आर्या अजय काळे ९१.६०% गुणांसह चतुर्थ, तर दहिगाव येथील संस्कृती राहुल शिंदे ९१.४०% गुणांसह पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

विद्यालयाच्या या निकालात गुणवत्तेचा दर्जा उंचावलेला असून एकूण ४६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी मिळवली आहे. तसेच ४६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ०४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र बाळासाहेब कदम, सचिव श्री. देवेंद्र बाळासाहेब कदम, शालेय समिती अध्यक्ष श्री. धनसिंग सदाशिवराव कदम आणि विश्वस्त ॲड. श्री. संजीव प्रतापराव कदम यांनी सर्वांचे कौतुक केले. याप्रसंगी मेजर (नि.) श्री. प्रवीण चव्हाण, श्री. विजयसिंह कदम, श्री. रवींद्र कदम, श्री. प्रवीण कदम, श्री. अरविंद कदम, श्री. बाळासाहेब कदम, श्री. भीमराव कदम, श्री. पुरुषोत्तम माने, प्राचार्य श्री. प्रदिप ढाणे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख, दत्तात्रय गावडे आणि प्रा. सुरेश निंबाळकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

lagnaustav.com
क्लिक करा व भेट द्या

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू