Ujjwal Nikam : उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी

Ujjwal Nikam  : उज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी

Ujjwal Nikam राष्ट्रपती कोट्यातून खासदारपदी नामांकन, सी.सदानंदन मोस्ते, हर्षवर्धन शृंगला आणि मिनाक्षी जैन यांचीही निवड

महाराष्ट्रातील जेष्ठ सरकारी वकील आणि कायदेतज्ञ उज्वल निकम Ujjwal Nikam यांची राज्यसभेवर वर्णी लागली असून राष्ट्रपती कोट्यातून नामनिर्देशित खासदार म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच केरळ मधील प्रभावी शिक्षणतज्ञ आणि समाजसेवक सी.सदानंदन मोस्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि प्रसिद्ध इतिहासकार व शिक्षणतज्ञ असलेल्या मिनाक्षी जैन यांचीही निवड राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून करण्यात आली आहे. सरकराने यापूर्वीच त्यांना त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा गौरव म्हणून पदमश्री

लोकसभेला पराभव आता राज्यसभेच्या वर्णी

सरकारी वकील म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या उज्वल निकम यांनी २० २४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून त्यांनी हि निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. यावेळी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या प्रतिस्पर्धी उमदेवार होत्या त्यामुळे हि लढत लक्षवेधी झाली होती. वर्षा गायकवाड यांचेकडून त्यांना येथे पराभव स्वीकारावा लागला होता, आता ते वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेवर नामनिर्देशित झाले आहेत. त्यामुळे भाजपने त्यांचे पुनर्वसन केले आहे.

सरकारी वकील ते खासदारपदी निवड

महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील म्हणून Ujjwal Nikam उज्ज्वल निकम यांची कारकीर्द नावाप्रमाणेच उज्वल राहिली आहे. त्यांच्या कायद्यातील निष्णात अभ्यासाचा आणि अनुभवाची ओळख हि अनेक खटल्यामध्ये पाहायला मिळाली आहे. २ ६ /१ १ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा एकमेव पाकिस्तानी आरोपी अजमल कसाबला फाशीची सजा मिळाली त्यावेळी त्यांच्या निष्णात युक्तिवादाची चर्चा जगाने पाहिली. यापूर्वी त्यांनी राज्यातील गाजलेल्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. यामध्ये १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट, टी सिरीजचे गुलशन कुमार हत्या, प्रमोद महाजन हत्या या खटल्यात त्यांनी काम पाहिले आहे. राष्ट्रीय पातळीवरील अनेक खटलेही त्यांनी यशस्वी लढवले.

उज्वल निकम यांचा जीवनप्रवास (Ujjwal Nikam Biography)

उज्वल निकम यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील त्यांचे वडील देवरामजी निकम हे बॅरिस्टर व न्यायाधीश होते, तर आई गृहिणी होत्या. महाविद्यालयीन शिक्षण विज्ञान मधून पदवी घेतल्या नंतर पुढे जळगावच्या केसीई सोसायटीच्या एस.एस.मणियार लॉ कॉलेज मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. जळगावच्या जिल्हा न्यायालयात अभियोक्ता म्हणून त्यांनी सेवा कारकीर्द सुरु केली, पुढे ३० वर्षात अनेक राज्य व देशस्तरावरील खटल्यामध्ये त्यांनी काम पाहिले. ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ६२८ जन्मठेपेची शिक्षा आणि ३७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू