Sant Tukaram Maharaj Palkhi: तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान.. अवघे देहू वैष्णवमय 

Sant Tukaram Maharaj Palkhi: तुकोबारायांचे पंढरीकडे प्रस्थान.. अवघे देहू वैष्णवमय 

भर पावसात वारकरी टाळ, मृदुंग, वीणेच्या नादात तल्लीन

Sant Tukaram Maharaj Palkhi भेटी लागी जीवा,  लागलीसी आस या संत उक्तीप्रमाणे विठुरायाच्या भेटीची आस घेऊन लाखो वारकऱ्यांचा मेळा घेऊन जगतगुरु संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याने आज टाळ-मृदूंगाच्या तालावर आणि ग्यानबा तुकारामाच्या नामघोषामध्ये पंढरपूरकडे प्रस्थान केले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या हजेरीने देहू नगरी वैष्णवमय झाली. दुपारी अडीचच्या सुमारास संत तुकाराम महाराज पादुकांचे पालखीतून प्रस्थान झाले. 

आज पहाटेपासून देहूतील देऊळवाड्यात पालखी प्रस्थानची लगबग सुरु होती. मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विधिवत पूजा,अर्चा आणि आरती झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार,आमदार सुनील शेळके, आमदार महेश लांडगे यांची यावेळी उपस्थिती होती.

FB IMG 1750254623787

सकाळी प्रस्थानपुर्वी परंपरेप्रमाणे भजनी मंडपात देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. मंदिराच्या प्रागंणात यावेळी वारकऱ्यांची भर पावसात वारकरी टाळ, मृदुंग, वीणेच्या नादात तल्लीन होऊन अभंगाच्या चाली गात नामघोष केला. वारकरी पाऊली आणि फुगड्यांचे धरलेले फेर यामुळे वारकऱ्यांचा उत्साह टिपेला पोहचला. खांद्यावर पताका, डोईवर तुळस, डोळ्यात तुकोबारायांचे दर्शनाची आस आणि मुखाने ग्यानबा तुकोबाचा जयघोष  अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहू नगरी पावसासोबतच भक्तिरसात चिंब झाली. रथाच्या पुढे २७ व मागे ३७० दिंड्या सोबत फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथातून  तुकोबारायांचा ३४० व्या पालखी सोहळ्याने पंढरपुराकडे पावले ठेवली. 

FB IMG 1750254633962
Sant Tukaram Maharaj Palkhi

असा असेल पालखी सोहळ्याचा प्रवास आणि मुक्काम 

आजचा मुक्काम इनामदार वाड्यात तर उद्या पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डीला पालखीसोहळ्याचा मुक्काम असेल २० जून रोजी पुणे शहरात मुक्कामाला पोहचेल. येथील निवडुंगा विठोबा मंदिरात पालखी विसावेल.. दोन दिवस पालखी पुणे मुक्कामी असेल येथे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत तुकोबारायांची भेट होईल. पुण्यानंतर २३ रोजी लोणी काळभोर, २४ जून-यवत, २५ जून-वरवंड, २६ जून-उंडवंडी, २७ जून-बारामती, ३०जून -सणसर, २९ जून- निमगाव केतकी, ३० जून- इंदापूर, १ जुलै- सराटी, २ जुलै- अकलूज, ३ जुलै- बोरगाव श्रीपूर, ४ जुलै- पिराची करोली, ४ जुलै- वाखरी असा २१ दिवसांचा प्रवास करीत ५ जुलैला पंढरपुरात पोहचेल. 

असे रंगतील रिंगण सोहळे 

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात एकूण सहा रिंगण पार पडतात यापैकी ३ उभे व ३ गोल रिंगण असतील. पहिले गोल रिंगण बेलवडी येथे, दुसरे मेंढ्याचे गोल रिंगण काटेवाडी येथे तर तिसरे गोल रिंगण अकलूज येथे होईल. तत्पूर्वी सराटी येथे पादुकांचे निरास्नान होईल. तसेच पहिले उभे रिंगण माळीनगर, दुसरे तोंडले बोडले येथे तिसरे वाखरी अंथुर्णे येथे होते. 

Sant Tukaram Maharaj Palkhi

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)