
IND vs AUS फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
IND vs AUS आज दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला चार गडी राखून पराभूत करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या विजयाने भारताने विश्वचषकातील पराभवाची ऑस्ट्रेलियाला परतफेड केली. आणि चॅम्पियन ट्रॉफीतून ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला.
IND vs AUS सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियाने 49.3 षटकांत सर्व गडी गमावून 264 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 73 आणि अलेक्स केरीने 61 धावा केल्या, तर भारताकडून मोहम्मद शमीने 48 धावांत तीन गडी घेतले.
भारताच्या प्रतिसादात, विराट कोहलीने आपल्या लौकिकला साजेशी 84 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली, तर श्रेस अय्यरने विराट ला साथ देत 45 धावा जमवल्या, दोघांनी भारताला मजबूत स्थितीत आणले. केएल राहुलने नाबाद 42 धावा केल्या त्याने विराट सोबत नंतर मैदानावर टिकून भारताला विजयाचा मार्ग दाखवला. हार्दिक पांड्याने शेवटच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. के एल राहुलच्या विजयी षटकाराने भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब झाले.
या विजयासह, भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्याशी होईल.
भारताच्या विजयामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेशदिमाखात झाला असून आता अंतिम फेरीचा सामना रविवारी दुपारी दीड वाजता भारताच्या प्रवेशामुळे लाहोर ऐवजी दुबईत होईल.
