अधिवेशनाचा पहिला दिवस, मंत्री पंकजा मुंडेंची Electric Car ने एंट्री

अधिवेशनाचा पहिला दिवस, मंत्री पंकजा मुंडेंची Electric Car ने एंट्री

Electric Car च्या वापरासाठी प्रतिकात्मक संदेश

Electric Car Mahindra XEV 9e वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी पारंपारिक इंधनाला फाटा देत पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यास आव्हान सरकार वेळोवेळी करत असते अशावेळी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नव्या इलेक्ट्रिक कारने Electric Car प्रवेश करत प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी प्रतिकात्मक संदेश देत इलेक्ट्रिक वाहनांचे वापर करण्याचे आवाहन केले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आजपासून मुंबईत सुरुवात झाली यावेळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानभवन परिसरात इलेक्ट्रिक वाहनाने प्रवेश केला. Mahindra XEV 9e ही Electric Car खरेदी केली असून पर्यावरण पूरक Electric Car वापरणरया बहुदा त्या राज्यातील पहिल्या मंत्री आहेत. त्यांच्या या कृतीने Electric car वापरासाठी जनतेला प्रोत्साहन मिळणार आहे, त्यांच्या या Eco Friendly एंट्रीची आज विधान भवनात चर्चा होती.

पर्यावरण मंत्री या नात्याने दैनंदिन प्रवासासाठी इलेक्ट्रिक वाहन Electric Car, Electric Vehicle वापरण्याचा मनोदय व्यक्त करत तशा सूचना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे काही दिवसांपूर्वी विभागाला दिल्या होत्या, त्यानुसार विभागाकडून इलेक्ट्रिक कार त्यांना उपलब्ध झाली. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असल्याने याच ईव्ही कारमधून त्यांनी रामटेक शासकीय निवासस्थान ते विधानभवन असा प्रवास केला. यावेळी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू