राज्यात एक जिल्हा,एक उत्पादन योजनेला गती देणार: DCM Eknath shinde

राज्यात एक जिल्हा,एक उत्पादन योजनेला गती देणार: DCM Eknath shinde

राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याची ओळख असलेले एक तरी आगळे वेगळे उत्पादन आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाला गती देण्यासाठी त्या जिल्ह्यात त्या उत्पादकांचे क्लस्टर करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath shinde) यांनी केल्या. याप्रसंगी दिले.

उद्योग विभागाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कामगारांची थकीत देणी देण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, कामगारांची देणी वर्षानुवर्ष थकीत ठेवून आजारी किंवा बंद अवस्थेतील उद्योग आणि कारखाने हे एमआयडीसीच्या जागांवरील आपली मालमत्ता विकून टाकतात. त्यामुळे कामगारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. या कामगारांची थकीत देणी प्राधान्याने देण्याची बाब त्वरित एनसीएलटी म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधीकरणाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि आजारी उद्योगांवर लक्ष ठेवून त्यांचा डेटा अद्यावत करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करावा असे निर्देश यासमयी दिले.

समाजातील विविध घटकांसाठी आपण आरोग्य तपासणी मोहीम आणि शिबिरे राबवली जातात. त्याच धर्तीवर आता एमआयडीसीमार्फत आरोग्य विभागाच्या मदतीने औद्योगिक क्षेत्रातल्या सर्व कामगारांसाठी व्यापक प्रमाणात आरोग्य शिबिरं आयोजित करून त्यांची व्यवस्थित वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे निर्देश यावेळी दिले. छोट्या उद्योगतील कामगारांच्या तपासणीला विशेष महत्त्व द्यावे असेही निर्देश याप्रसंगी दिले.

तसेच राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याची ओळख असलेले एक तरी आगळे वेगळे उत्पादन आहे. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाला गती देण्यासाठी त्या जिल्ह्यात त्या उत्पादकांचे क्लस्टर करावे. त्या उत्पादनांसाठी संशोधन आणि विकास (आरएनडी) केंद्र सुरू करावी तसेच त्याला कौशल्य विकासाची जोड द्यावी जेणेकरून स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल असेही यावेळी सुचवले.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग सचिव डॉ.पी.अनबलगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह यांनी सादरीकरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, एमआयडीसी तसेच उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

#EknathShinde#Maharashtra

Shivsena – शिवसेनाUday Ravindra Samant

Prabhukrupa Automobiles

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महाराष्ट्राची पारंपरिक लोककला- लोकनाट्य तमाशा Natural Cold Drinks for Summer: उन्हाळा वाढला, हि नैसर्गिक पेये ठेवतील शरीराला कुल-कुल होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू