ZP School देऊर मराठी शाळेला सर्वोतपरी सहकार्य करणार- राहुल कदम

ZP School देऊर मराठी शाळेला सर्वोतपरी सहकार्य करणार- राहुल कदम

ZP School मराठी शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांचा निर्धार

कोरेगाव/वार्ताहर
देऊर जिल्हा परिषद शाळेने ZP School आजपर्यंत गुणवत्ता जपली आहे, देऊरकरांच्या यशाचा पाया रचणाऱ्या जिल्हा परिषद शाळेसाठी सर्वतोपरी सहकार्य करून सर्व सुविधायुक्त एक आदर्श जिल्हा परिषद शाळा बनवण्यासाठी प्रयत्न करूयात या कामात देऊर गावाची नेहमीप्रमाणे मोलाची साथ मिळेल असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम यांनी व्यक्त केला.
देऊर शाळेमध्ये आयोजित शिक्षक पालक सहविचार सभेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश कदम, माजी अध्यक्ष मधुकर दोरके, विजयकुमार टंकसाळे, सेवानिवृत्त शिक्षक आयुब खलिफा, पत्रकार संजय कदम, पत्रकार प्रकाश राजे मुख्याध्यापिका शोभा शिंदे, शिक्षिका संगीता गायकवाड, शिक्षिका वैशाली चव्हाण, शिक्षक रमेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेमध्ये बदलून आलेल्या नवीन शिक्षकांचा स्वागत सत्कार देऊर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी राहुल कदम म्हणाले, शाळेसाठी नवीन इमारत व खेळाचे मैदान बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लवकरच याकामी यश येईल. शाळेला सुविधा उपलब्ध करून देण्यास कुठेही कमी पडणार नाही, तालुक्यात आदर्श जिल्हा परिषद शाळा म्हणून शाळा नावलौकीक मिळवेल त्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेतील. यावेळी शाळेच्या विकासासाठी आपली शाळा म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावं असे आवाहन शिक्षक रमेश चव्हाण यांनी व्यक्त केले व शाळेच्या विकासाचा आराखडा मांडला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश कदम म्हणाले, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कष्ट घेत आहेत त्यास पालक व माजी विदयार्थी म्हणून समर्थ साथ देऊयात.
यावेळी मुख्याध्यापिका शोभा शिंदे, विजयकुमार टंकसाळे, आयुब खलिफा, अनुजा पालकर यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी नंदकुमार कदम, दिनेश देशमुख, सोमनाथ कदम, बंडू गुरव, गणेश देशमुख, संपत कर्पे, विशाल कुंभार, विशाल देशमुख, मिलिंद काकडे, शिक्षक, विदयार्थी व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

व्हिडीओ बातमी पहा पुढे क्लिक करा महाराष्ट्र वन न्यूज यु ट्यूब

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)