World Heritage: दुर्गराज रायगडसह बारा किल्ले ‘जागतिक वारसा’ यादीत

World Heritage: दुर्गराज रायगडसह बारा किल्ले ‘जागतिक वारसा’ यादीत

World Heritage जगभरातील ३२ स्थळांचे मूल्यांकन

World Heritage मराठा मिलिटरी लँडस्केप्स चा जागतिक गौरव

World Heritage: महाराष्ट्रासाठी अभिमानाची वार्ता असून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज रायगडसह १२ शिवकालीन किल्ले यांचा समावेश जागतिक वारसा यादीत झाला असून वर्ल्ड हेरिटेज मुळे दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागअंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) यांचा समावेश होता.

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ‘अद्वितीय वैश्विक मूल्य (Outstanding Universal Value)’ या निकषांवर हे किल्ले खरे उतरले. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.

World Heritage: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आनंद

प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे. या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर १ तामिळनाडू मध्ये आहे. जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो. कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात. मी सर्वांना आवाहन करतो की, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या. अशा शब्दात शुभेच्छा देत त्यांनी किल्ले रायगडाला २ ० १ ४ साली भेट दिलेला फोटो एक्स वर पोस्ट केला आहे व ही 2014 मध्ये मी रायगड किल्ल्याला दिलेल्या माझ्या भेटीची छायाचित्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याची संधी मला लाभली होती. ही भेट मी सदैव स्मरणात राहील. असे ही पोस्टमध्ये लिहले आहे

पर्यटनमंत्री गजेंद्र सिंग शेखावत म्हणाले, “भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी खरोखर अभिमानाचा दिवस.”

अतिशय अभिमानाने, मी जाहीर करतो की युनेस्कोने ‘भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये’ – मराठा साम्राज्याचे १२ प्रतिष्ठित किल्ले – जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहेत. भारताच्या गौरवशाली भूतकाळाचे जतन आणि उत्सव साजरा करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल माझे मनापासून आभार. हे भारताचे ४४ वे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे – आपल्या समृद्ध संस्कृतीचा वारसा, स्वदेशी लष्करी अभियांत्रिकी आणि स्थापत्य प्रतिभेचा पुरावा आहे.महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ – १२ प्रतिष्ठित स्थळांमध्ये पसरलेले हे भव्य १७ व्या-१९ व्या शतकातील किल्ले धोरणात्मक प्रभुत्व, पर्यावरणीय सौहार्द आणि लवचिकतेच्या मराठा भावनेचे कालातीत प्रतीक म्हणून उभे आहेत. पॅरिसमधील जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या अधिवेशनात हा ऐतिहासिक शिलालेख मंजूर करण्यात आला.

मुख्यमंत्रांचे ट्विट ” World Heritage महाराष्ट्र आणि भारतासाठी एक अद्भुत क्षण आहे!”

खरोखर, हा महाराष्ट्र आणि भारतासाठी एक अद्भुत क्षण आहे!
हे शक्य करण्यासाठी तुमच्या सर्व प्रयत्नांसाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद सर! अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

World Heritage शासनाचा पुढाकार आणि व्यापक सहकार्य

World Heritage या ऐतिहासिक घडामोडीसाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकारमार्फत २०२४-२५ या वर्षाकरिता निवडलेल्या ५ प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाने युनेस्कोकडे पाठविण्यासाठी निवडला होता.

या यशस्वी प्रवासात वास्तुविशारद डॉ.शिखा जैन आणि पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे यांचे योगदान मोलाचे ठरले. ‘युनेस्को’च्या ४६व्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी, गड संवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचा सहभाग होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये ICOMOS तज्ज्ञ श्री. ह्वाजोंग ली यांनी या १२ किल्ल्यांची स्थळ भेट घेतली आणि जिल्हाधिकारी व वनविभागांनीही सहकार्य केले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)