Thackeray Brand
Thackeray Brand आता ५ जुलैला मुंबईत एकच मोर्चा निघणार
संजय राऊत यांचे ट्विट Thackeray Brand
ठरलं तर “पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही,त्याविरोधात मनसे आणि शिवसेना यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना मुंबईत दोन्ही पक्षाचे दोन मोर्चे न निघता एकच मोर्चा निघणार आहे. ५ जुलै ला भाषिक अस्मिता जपण्यासाठी ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येणार असून ठाकरे ब्रॅन्डचं चालणार अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्स पोस्ट करून दिली. पाच जुलै ला मुंबईत अनेक वर्षांनी ठाकरे पॉवर Thackeray Brand एकत्र दिसणार आहे
राज्यसरकारने पहिली पासून हिंदी याची घोषणा करताच राज्यातून या निर्णयाला सर्व पक्षातून कडाडून विरोध झाला, दरम्यान मनसे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावर आक्रमक भूमिका घेत “पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही,असा ठाम विरोध करीत आंदोलनाची तयारी केली तर शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही हिंदी धोरणाला विरोध करीत मोर्चा काढण्याचे जाहीर केले. दोन्ही पक्षाच्या मोर्चे वेगळे वेगळे दिवशी निघणार होते आता मात्र सरकारला भाषिक अस्मिता दाखवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र मोर्चा काढणार असून ५ जुलै ला आझाद मैदानावर यानिमित्ताने मनसे- शिवसेना Thackeray Brand पहिल्यांदाच एकत्र आंदोलनाचा एल्गार करेल.


शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत एक्स वर पोस्ट लिहली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ती रिपोस्ट करून याला दुजोरा दिला आहे या पोस्ट मध्ये संजय राऊत लिहतात “महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!” तर आणखी एका पोस्ट मध्ये “There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!” असे लिहले आहे सोबत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा एकत्र फोटो देखील पोस्ट केला आहे. यामुळे आता ५ जुलैला एकच मोर्चा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा निघणार आहे हे स्पष्ट झाले.
Thackeray Brand मनसे नेते राज ठाकरे यांचा पहिली पासून हिंदी धोरणाला विरोध लक्षात घेता काल सरकारच्या वतीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्यांची भेट घेत सरकारची भूमिका स्पष्ट केली मात्र राज ठाकरे व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यातील चर्चा फोल झाली, यातून समाधानकारक तोडगा निघाला नाही यानंतर लागलीच पुन्हा राज ठाकरे यांनी मनसे राज्यात हिंदीसक्ती होऊ देणार नसल्याचे स्पष्ठ केले. ते म्हणाले “पहिलीपासून हिंदीसक्ती होऊ देणार नाही, त्याविरोधात येत्या ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. मराठी हाच अजेंडा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते. महाराष्ट्राची संपूर्ण ताकद गिरगाव चौपाटीवर दिसेल. अशावेळी मला हेही बघायचं आहे, या मोर्चात कोण सामील होतंय आणि कोण येणार नाहीत, हे देखील मला बघायचं आहे..शिक्षणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत. सर्व विद्यार्थी, पालकांना आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत. सरकारला एकदा कळू दे, महाराष्ट्राच्या मनात काय आहेत ते..हिंदीविरोधी मोर्चात सर्वजण सहभागी होतील. आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत. कोणताही वाद आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, हे तुम्हाला ६ जुलैला कळेल…” मात्र आता हा मोर्चा ६ जुलै ऐवजी ५ जुलै निघणार असल्याचे (Raj Thackeray) महाराष्ट नवनिर्माण सेनेने जाहीर केले आहे.






