School News :देऊर मराठी शाळेच्या विकासासाठी सेवा देणार- धनसिंग कदम

School News :देऊर मराठी शाळेच्या विकासासाठी सेवा देणार- धनसिंग कदम

School News चिमुकल्यांच्या कलाकृती प्रदर्शनाला ग्रामस्थांचा अलोट प्रतिसाद 

सातारा | विशेष प्रतिनिधी

देऊरच्या जिल्हा परिषद मराठी शाळेने गुणवत्तेची परंपरा जपली असून ग्रामस्थ म्हणून याचा सार्थ अभिमान आहे आजचे विद्यार्थ्यांचे कलाकृती पाहून आनंद वाटला, हीच मुले गावाचे समृद्ध  भविष्य आहे त्यांच्या विकासासाठी शाळेला सर्वोतपरी सहकार्य करून शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सेवा देणार असल्याचे प्रतिपादन देऊर विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष धनसिंग कदम यांनी व्यक्त केले. 

देऊर (ता.कोरेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथामिक मराठी शाळेत विदयार्थ्यांनी टाकाऊतून टिकाऊ वस्तूपासून बनवलेल्या कलाकृतीचे प्रदर्शनाचे उदघाटन धनसिंग कदम यांचे हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी सातारा येथील उद्योजक बाफनाशेठ, शालेय समिती अध्यक्ष निलेश कदम, राजाराम कदम, संजय कर्पे, वामन कदम, माजी सदस्य अजित कदम, प्रकाश सुतार, पत्रकार संजय कदम, पत्रकार प्रकाश राजे, मुख्याध्यापिका शोभा शिंदेयांची प्रमुख उपस्थिती होती. 

या प्रदर्शनामध्ये शालेय विद्यार्थांनी बनवलेल्या कोलाजकाम, कागदकाम, मातीकाम, चित्रकाम अशा विविध कलाकृती मांडण्यात आल्या होत्या. चिमुकल्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाला पालक व ग्रामस्थ यांनी भरघोस प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. 

मुख्याध्यापिका शोभा शिंदे, शिक्षिका संगीता गायकवाड, शिक्षिका वैशाली चव्हाण, शिक्षक रमेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कलाकृती प्रदर्शन यशस्वी केले. यावेळी माजी अध्यक्ष मधुकर कदम, नंदकुमार कदम, दिनेश देशमुख, सचिन कदम, सोमनाथ कदम, बंडू गुरव, गणेश देशमुख, संपत कर्पे, विशाल कुंभार, विशाल देशमुख, मिलिंद काकडे, गणेश जंगम व महिला पालक बहुसंख्यने उपस्थित होते. 

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)