Satara News शेतात टरबूज चोरायला आला अन चोरटा रंगेहाथ सापडला, थेट पोलिसांच्या ताब्यात

Satara News संबंधितांकडे मोबाईलही चोरीचा सापडला,
आसनगाव येथे टरबूज चोरताना चोर रंगेहात गावकऱ्यांनी पकडला
Satara News सातारा जिल्ह्यातील आसनगाव (ता. कोरेगाव) येथे शेतातील टरबूज चोरी करताना एका अज्ञात इसमाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे आसनगावमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. टरबूज चोरायला आला आणि चोरटा गावकऱ्यांच्या हाती सापडला थेट पोलिसांच्या हवाली झाला या घटनेची कोरेगाव तालुक्यात जोरात चर्चा सुरु होती.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत हणुमंत चव्हाण यांच्या शेतामध्ये टरबूज पिकाची लागवड करण्यात आली होती. उन्हाळ्याच्या हंगामात मोठ्या मेहनतीने वाढवलेल्या या पिकावर अज्ञात व्यक्तीने डोळा ठेवला होता. आज दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित इसम शेतात शिरून टरबूज तोडत असल्याचे काही गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने गावकऱ्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले आणि प्रत्यक्ष चोरी करत असताना त्याला पकडले.
घटनेनंतर गावकऱ्यांनी त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्रजवळील पोत्यात व सॅकमध्ये शेतातील ३५ टरबूज आढळून आल्याने त्याच्यावर संशय बळावला. त्यानंतर गावकऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व पुढील चौकशी सुरू केली आहे. त्याच्याकडे चोरीचा मोबाईलही सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
अलीकडील काळात ग्रामीण भागात भाजीपाला व फळपिकांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे नुकसान होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतमाल चोरीच्या घटनांबाबत पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले असून रात्री गस्त वाढविण्याचे संकेत देण्यात आले आहेत. रात्री बारामती तालुक्यातील युवकांविरोधात वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सपोनि सुशील भोसले अधिक तपास करीत आहेत. Satara News
हे पण वाचा सातारा–लोणंद महामार्गावर निकृष्ट कामाचा उद्रेक; सेना भाजपने केला रस्तारोको, काम बंदचा इशारा





