PM KISAN YOJANA : २० वा हप्ता कधी येणार याची उत्सुकता, या दिवशी वितरण होणार ?

PM KISAN YOJANA : २० वा हप्ता कधी येणार याची उत्सुकता, या दिवशी वितरण होणार ?

PM KISAN YOJANA जुलै महिन्यात लाखो शेतकऱ्यांना मिळणार खुशखबर

PM KISAN YOJANA प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार याची उत्सुकता देशातील लाखो शेतकऱ्यांना लागली आहे. देशभरातील गरजू शेतकरी बांधवाना शेतीच्या आर्थिक गरजा पूर्ण करताना मदत व्हावी या हेतूने केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी नावाने कल्याणकारी योजना सुरु केली. या योजनेत पात्र लाभार्थी शेतकरी यांना  प्रतिवर्षी ६ हजार रुपये मदत केली जाते. एका वर्षात तीन समान हप्त्यांमध्ये याचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केले जाते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात PM KISAN YOJANA या योजनेचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. 

२० वा हप्ता लवकरच जमा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याकडे लक्ष

 PM KISAN YOJANA २०१९ मध्ये  सुरु झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळाला त्यामुळे या योजनेची लोकप्रियता शेतकर्यांमध्ये सर्वाधिक आहे. आजपर्यँत या योजनेतून शेतकऱ्यांना नियमित हप्ते येत आहेत या योजनेचा १९ वा शेवटचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. आता जून महिन्यात खरीप हंगामाची तयारी शेतकरी वर्गाची सुरु असते अशावेळी पेरणी,खते, बी- बियाणे खरेदी अशा शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता असते त्यामुळे जून महिन्यात दरवर्षी या हप्त्याचे वितरण केले जाते यावेळी मात्र अद्याप जुलै महिना सुरु झाल्यातरी हा हप्ता आला नाही साहजिकच शेतकऱ्यांना PM KISAN YOJANA चा २० वा हप्ता कधी येणार याची उत्सुकता लागली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्स नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १८ जुलै रोजी बिहार दौऱ्यावर असून याचवेळी मोठ्या कार्यक्रमातून या हप्त्याचे वितरण होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जुलै महिन्यातच PM KISAN YOJANA चा २० हप्ता थेट बँकेत हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. याबाबत शासन पातळीवर दुजोरा नसला तरी गेल्या काही वर्षातील वितरण लक्षात घेता हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे

 पी. एम. किसान व नमो शेतकरी योजने विषयी माहिती

        प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून केंद्र शासनाने देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही नोव्हेंबर 2023 पासून महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना असून या दोन्ही योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे स्वरुप

पी एम किसान योजना देशभरातील जमीनधारक शेतकऱ्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेतंर्गत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात तीन समान हप्त्यामध्ये प्रति वर्ष 6 हजार रुपये हस्तांतरीत केले जातात. या PM KISAN YOJANA योजनेमुळे देशातील लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्रता- 

कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देय राहील. (पती, पत्नी किंवा 18 वर्षा खालील मुलास लाभ मिळत असल्यास कुटुंबातील इतर सदस्यास लाभ मिळणार नाही.)

लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक. (फेरफार फेब्रुवारी 2019 च्या पूर्वीचा असावा), अपवाद मयत शेतकऱ्याकडून वारसा हक्काने जमीनीचे हस्तांतरण झाल्यास लाभ देय)

अर्ज कोठे करावा- 

केंद्र शासनाच्या पी एम किसान पोर्टल वर स्वयं नोंदणी करणे.

सामुहिक सुविधा केंद्र (CSC) मार्फत PM KISAN YOJANA पोर्टलवर नोंदणी. 

लिंक वर क्लिक करा https://pmkisan.gov.in/

काय आहे पात्रता योजनेत सहभागाची

PM KISAN YOJANA पी एम किसान योजने अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील आवश्यक बाबीची पूर्तता करणे आहे तर त्यांच्या योजनेत समावेश होईल.

           1) भूमि अभिलेखेप्रमाणीकरण (महसूल विभागामार्फत)

           2) आधार प्रमाणीकरण

           3) e-KYC प्रमाणीकरण.

e-KYC केली नसेल तर लगेच करून घ्या 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी प्रक्रिया सुलभ आहे तरीही अनेकांच्या खात्यावर या PM KISAN YOJANA योजनेचे पैसे जमा होत नाहीत त्या शेतकऱ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे,

OTP आधारित: वेबसाइटवर जाकर आधार नंबर नोंदवा आणि OTP च्या माध्यमातून तपासणी करता येईल किंवा बायोमेट्रिक केवाईसी: जवळच्या सीएससी सेंटरवर जाकर फिंगरप्रिंट या आईरिस स्कॅनची प्रक्रिया पूर्ण करू शकतो. 

(वरील लेख हा आंतरजालावरील उपलब्ध माहितीच्या आधारे लिहला आहे, याच्या सत्यापनची जबाबदारी महाराष्ट्र वन यांची नाही)

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)