Maharashtra Police Bharti 2025 आनंदाची बातमी पोलीस दलात १५ हजार पदाची मेगा भरती! वयोमर्यादा बाबत मोठा निर्णय?

Maharashtra Police Bharti 2025 आनंदाची बातमी पोलीस दलात १५ हजार पदाची मेगा भरती! वयोमर्यादा बाबत मोठा निर्णय?

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आज महत्त्वाचा निर्णय घेत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो युवकांना दिलासा दिला आहे. पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या हजारो युवकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस दलातील तब्बल १५ हजार पदे भरण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र डीजीआयपीआर या एक्स हँडलवरून या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पोलीस दलातील शिपाई पदाच्या जागा भरतीचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३,५६० पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी जून महिन्यात पोलीस महासंचालकांनी सुमारे १० हजार पोलिसांची भरती करण्याचे आणि १५ सप्टेंबरला मैदानी चाचणी होणार असल्याचे सांगितले होते.

मात्र, त्यानंतरही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी समन्वय समितीने काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरपूर्वी शासन निर्णय, अर्ज भरणे, अर्ज छाननी आणि परीक्षा घेणे अशक्य आहे, अशी मागणी विद्यार्थी समन्वय समितीने मागच्याच आठवड्यात केली होती.Maharashtra Police Bharti 2025

कुठली पदे .. किती जागा

Maharashtra Police Bharti 2025 महाराष्ट्र पोलीस दलात यंदा मेगा भरती होणार असल्याने भरती इच्छुक युवकांच्या आनंदाचे वातावरण आहे. या भरतीमध्ये खालील पदांसाठी जागा भरण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई – १०९०८ पदे,

पोलीस शिपाई चालक- २३४,

बॅण्डस मॅन- २५ ,

सशस्त्र पोलीस शिपाई- २३९३,

कारागृह शिपाई-५५४

भरतीसाठी काय आहेत अटी

पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गटकसंवर्गातील आहेत पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हास्तरावरून राबविण्यात येत असून ओ एम आर आधारित लेखी परीक्षा यासाठी घेण्यात येईल तसेच भरतीसाठी अर्ज मागवणे अर्जाची छाननी करणे त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठीच्या प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

होळीत या गोष्टींचे दान देईल जीवनाला समृद्धी | Holi Donation Benefits, Holi Donation Guide 2026: Things to Donate for Prosperity and Luck संजू सॅमसनचा ‘रुद्र’ अवतार! विंडीजला धूळ चारत टीम इंडिया सेमी फायनलमध्ये Iran–Israel War: मध्य पूर्वात युद्धाचा भडका, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा हल्ल्यात मृत्यू Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)