HSRP Number Plate
HSRP Number Plate केंद्राची शेवटची मुदतवाढ नंतर थेट होणार कारवाई
राज्यसरकारने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एचएसआरपी केंद्र सरकारने नंबर प्लेट सक्ती केल्यानंतर नंबर प्लेट बनवण्यासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ देत १५ ऑगस्टला शेवटची तारीख दिली होती अशावेळी वाहनधारकांची घाई झाली होती मात्र केंद्र सरकारने आता वाहनधारकांना शेवटच्या दिवशी मोठा दिलासा दिला असून आता शेवटची चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात परीवहन विभागाने सन २०१९ सालच्या वाहनांसाठी अगोदर वाहनाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उच्च सुरक्षा पाटी अर्थात HSRP Number Plate बसविणे सक्तीची केली होती. त्या अनुषंगाने वाहनधारकांसाठी उद्या शेवटची तारीख आहे अशावेळी अडीच महिने उलटून गेली तरी अद्याप लाखो वाहनधारकांनी अद्याप HSRP Number Plate बसवलेल्या नाहीत. फक्त पुण्यात जवळपास २६ लाख पेक्षा जास्त वाहनांना अजून HSRP Number Plate बसवावी लागणार आहे तर इतर मोठ्या शहरातही बहुसंख्यने लाखो वाहनधारक अद्याप HSRP Number Plate विना आहेत. वाहनांची संख्या जास्त आणि HSRP Number Plate बसवण्याची प्रक्रिया आणि लागणारा वेळ यामुळे हि प्रक्रिया मंदावली आहे. आता चौथी आणि शेवटची मुदतवाढ ३० नोव्हेंबर २०२५ दिली असून यानंतर वायुवेग भरारी पथकाच्या माध्यमातून थेट कारवाई करण्यात येईल अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली.
राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांपैकी फक्त १५ ते १ ७ टक्के वाहनांनीच फक्त HSRP Number Plate लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे १५ ऑगस्ट पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना सप्टेंबर महिन्यातील तारखा मिळाल्या आहेत. ग्रामीण भागात HSRP Number Plate फिटमेन्ट सेंटरची संख्या खूप कमी आहे तर अनेक ठिकाणी ती बंद झाली आहेत यामुळे वाहनधारकांची HSRP Number Plate साठी गैरसोय होत आहे साहजिकच यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती अखेर पुन्हा मुदतवाढ देऊन वाहनधारकांना दिलासा दिलाच आहे मात्र हि शेवटची मुदतवाढ असल्याचे स्पष्ट केले आहे.






